शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, तेव्हापासून ठाकरेंचा एक विश्वासू म्हणून ओळखला जाणारा, सतत ठाकरे आणि शिवसेनेसाठी धडपडणारा एक कार्यकर्ता अचानक दिसेनासा झाला आहे. त्या कार्यकर्त्यांची सध्या चर्चा होत आहे.
उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून सतत त्यांच्या सोबत असणारा हा ठाकरेंचा विश्वासू कार्यकर्ता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मिलिंद नार्वेकर आहे. ठाकरे सरकारचे पडद्यामागून सूत्रे हलविणारे नावर्केर हे सध्या दिसेनासे झाले आहेत. शिवसेनेसाठी धपडप करणारे नार्वेकर शिवसेनेवर संकट असताना पुढे येत नसल्याचं चित्र दिसत आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, बंडखोर आमदारांना पटवून मुंबईत आणणण्यासाठी ते सुरतेत दाखल झाले होते. तेथून त्यांनी नेते एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यांची समेट घडविण्याची धडपड केली होती. सतत ठाकरेंच्या मागेपुढे सावलीसारखे दिसणारे नार्वेकर सध्या कुठे आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यानंतर सेना भवनावर बैठका घेतल्या. तेथे देखील नार्वेकर उपस्थित नव्हते. पण ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा दिल्यानंतर तो घेऊन नार्वेकर हे राज्यपालांकडे गेल्याचेही सांगण्यात येत आले. पण त्यानंतर ते दिसलेच नाहीत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल २८-२९ वर्षे सावलीसारखे वावरणारे नार्वेकर हे ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्ता वर्तुळात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘वर्षा’ आणि ‘सहयाद्री’ अथितिगृहात त्यांचा मोठा दबदबा होता.
ठाकरेंवर टीका करायची असेल तर ती नार्वेकरांवर केली जायची आणि त्या आडून ठाकरेंना बोल लावण्यात येत होते. जेव्हा सर्व बंडखोर आमदार शिंदे गटात सामील होत होते त्या दरम्यान, नार्वेकर यांनी ट्विट केलं होतं की, ‘मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे’ त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं होतं.
सध्या चर्चा आहे की, ‘धर्मवीर’ चित्रपटात दाखवलेले ठाकरेंचे सर्वांत जवळचे आणि शिवसेनेचे कट्टर नेते, कार्यकर्ते ठाकरेंपासून लांब झाले आहेत. त्यात उद्धव ठाकरेंसोबत सतत सावलीसारखे असणारे नार्वेकर देखील गायब झाले आहेत त्यामुळे ते नेमके कुठे गेले याबद्दल चर्चा होत आहे.