ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मायकेल क्लार्कवर त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रोने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये क्लार्कला त्याची गर्लफ्रेंड कानशिलात मारत आहे.
क्लार्क जेड यारब्रोची बहीण जास्मिनला फटका मारतो. त्यामुळे त्याची गर्लफ्रेंड खुप संतापते आणि ती त्याच्या कानशिलात लगावते. याचा व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मायकल क्लार्क शर्टलेस दिसत आहे. व्हिडिओमध्ये क्लार्क त्याच्यावरील आरोप फेटाळताना ऐकू येत आहे.
क्लार्क व्हिडिओमध्ये म्हणत आहे की मी शपथ घेतो की हे खरे नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेतो. मायकेल क्लार्क त्याची गर्लफ्रेंड यारब्रो, तिची बहीण जास्मिन आणि तिचा पती कार्ल स्टेफानोविकसह सुट्टीवर होता. असे सांगितले जात आहे की चौघेही जेवत होते, तेव्हा हा वाद झाला. यारब्रोची बहीण जस्मिन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टीव्ही होस्ट आहे.
हे फुटेज समोर आल्यानंतर क्वीन्सलँड पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले की, ‘क्वीन्सलँड पोलिस क्लार्क त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो यांचा तपास करत आहे.
२००५ मध्ये मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला होता. आपल्या संघाला कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर आणण्यात क्लार्कचा मोलाचा वाटा आहे. क्लार्कने २०११ मध्ये रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर २०१५ मध्ये अॅशेस मालिकेनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
https://twitter.com/SuperCoachIQ/status/1615671526736678912
मायकल क्लार्कचे नाव सर्वात आधी मॉडेल लारा बिंगलशी जोडले गेले होते. २००७ मध्ये दोघांनी डेटिंग सुरू केली. २०१० मध्ये सोशल मीडियावर बिंगलचे शॉवरचे फोटो लीक झाल्यानंतर क्लार्क आणि ती वेगळे झाले. २०१२ मध्ये क्लार्कने कायली बोल्डीशी लग्न केले.
काइली बोल्डी ही सिडनीच्या वेस्टफिल्ड स्पोर्ट्स हाय येथे क्लार्कची क्लासमेट होती. काइली आणि क्लार्कला २०१५ मध्ये एक बाळही झाले. पण २०२० मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर क्लार्कने फॅशन डिझायनर पिप एडवर्ड्सला डेट करायला सुरुवात केली, पण त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले.
महत्वाच्या बातम्या-
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ आहेत कोट्यवधी रुपयांचे मालक, संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का
जिवंतपणी प्रेमविवाहाला विरोध, दोघांनी जीव दिल्यानंतर उघडले कुटुंबाचे डोळे; पुतळ्यांचं लावलं लग्न
हिंदुत्ववादाचा डंका वाजवणाऱ्या फडणवीसांच्या पत्नीला हे शोभते का ? ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले