Share

सचिनच्या पोराने वाचवली रोहितची लाज, थरारक सामन्यात मुंबईने हैद्राबादला 14 धावांनी हरवले; ‘हे’ ठरले विजयाचे हिरो

SRH vs MI: IPL चा 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा केल्या. ज्यामध्ये कॅमेरून ग्रीनने नाबाद राहताना ६४ धावांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ज्यामुळे मुंबई इंडीयन्स एवढी मोठी धावसंख्या उभी करू शकली. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचे फलंदाज मुंबई इंडीयन्सच्या गोलंदाजीसमोर हतबल दिसत होते. त्यामुळे हा सामना मुंबईने १४ धावांच्या फरकाने जिंकला.

मुंबईने शेवटच्या 15 मिनिटांच्या नाट्यात हैदराबादला पायदळी तुडवत विजय हिसकावला. 192 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची या सामन्यात खराब सुरुवात झाली कारण सलामीवीर हॅरी ब्रूक 11 धावा करून 9 धावा करून स्वस्तात बाद झाला.

त्याचवेळी राहुल त्रिपाठीनेही 7 धावा केल्या. यानंतर मयंक अग्रवाल आणि कर्णधार एडन मार्कराम यांनी स्थितीनुसार फलंदाजी करताना संघाला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याची मेहनत संघाला जिंकून देऊ शकली नाही.

पण मार्कराम २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात अभिषेक वर्माच्या रूपाने आणखी एक मोठा धक्का बसला. अभिषेक 1 धाव घेतल्यानंतर पियुष चावलाच्या षटकात बाद झाला. त्याचवेळी जलद धावा करण्याच्या नादात नारिक क्लासेनने १४व्या षटकात आपली विकेट गमावली.

क्लासेनने वेगवान फलंदाजी करताना 16 धावांत 36 धावा ठोकल्या. सनरायझर्स हैदराबाद संघाचा अर्धा संघ 15 षटकात 128 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता, परंतु मयंक अग्रवाल खेळपट्टीवर उभा राहिला, परंतु तोही 48 धावांवर बाद झाला.

शेवटी मोठे फटके खेळून वॉशिंग्टन सुंदर जिंकवेल अशी अपेक्षा होती. पण सुंदर दुर्दैवी धावबाद झाला. यानंतर हैदराबादचा पराभव निश्चित झाला. एमआयच्या फलंदाजांनी एसआरएचविरुद्ध चांगली फलंदाजी केली.

मुंबई इंडियन्सच्या इनिंगबद्दल बोलायचे झाले तर या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी इनिंगला सुरुवात करून आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी झाली, या सामन्यात रोहितने 28 आणि ईशानने 38 धावा केल्या.

सूर्यकुमार यादव 7 धावा करून बाद झाला असला तरी कॅमेरून ग्रीनने नाबाद राहताना 64 धावांची स्फोटक खेळी खेळली. तर तिलक वर्मा 37 आणि टीम डेव्हिड 17 धावा करण्यात यशस्वी ठरला. मुंबईच्या सर्व फलंदाजांनी केलेल्या उत्तम फलंदाजीमुळे 5 विकेट गमावून 192 धावांपर्यंत मजल मारली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही हैदराबादविरुद्ध आपली विकेट्सची भूक कायम ठेवली. मुंबईच्या फलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना अजिबात फॉर्म दिला नाही, त्यामुळे फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला.

यामुळेच SRH संघाने 10 षटकात 76 धावा करून आपले 4 महत्त्वाचे विकेट गमावले. मुंबईचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने अतिशय तगडी गोलंदाजी करत 3 षटकांत 18 धावांत 2 बळी घेतले, तर अर्जुन तेंडुलकरने 2 षटकांत 7 धावांच्या प्रभावी सरासरीने 14 धावा दिल्या.

सचिनच्या पोराने वाचवली रोहितची लाज
कर्णधार रोहित शर्माने सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर विश्वास व्यक्त करत सामन्याचे शेवटचे षटक दिले. अर्जुनने कर्णधाराच्या भरवशावर उतरत अखेरच्या षटकात 20 धावा वाचवत संघाला विजय मिळवून दिला. तसेच आयपीएलमधली पहिली विकेटही घेतली.

तर पियुष चावला आणि कॅमेरून ग्रीनने 1-1 बळी घेत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. शेवटच्या १५ मिनीटांत सामना अटीतटीचा झाला होता. पण मुंबईने नाट्यमय घडामोडींदरम्यान चांगले डावपेच लढवत विजय निश्चीत केला.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now