तरुण मुला-मुलींमध्ये प्रेम प्रकरणातून अनेक घातक प्रकार घडलेल्या गोष्टी कानावर पडत असतात. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना बिहारच्या गोपाळगंजमध्ये घडली. पोलिस तपासात एक प्रियकर आपल्या प्रियसीचा मारेकरी ठरला. (Merciless! A minor girl was made pregnant, and then killed and fed to animals)
१६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेम संबंधातून ती मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्यावर संशय घेत त्या मुलाने प्रियसीच्या हत्येचा कट रचला.
प्रियसीला भेटायला बोलवून त्याने तिला गुंगीचे औषध दिले. ती बेशुध्द पडल्यावर ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील हथूआ गावात घडला.
या भयानक घटनेत फक्त हत्या करूनच तो तरुण थांबला नाही, तर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने प्रियसीचा मृतदेह चक्क जनावरांसमोर खाण्यासाठी फेकून दिला. १४ जुलै रोजी घडलेल्या या घटनेची तब्बल पाच दिवसानंतर पोलिसांना खबर लागली.
पोलिसांनी जेव्हा तो मृतदेह पाहिला तेव्हा फक्त मुलीच्या शरीराचा सांगाडा आणि कपडे त्या ठिकाणी पडली होती. पोलिसांनी गावात चौकशी केली असता गावकरी आणि तिच्या कुटुंबीयांना कपड्यांवरून मुलीची ओळख पटली.
मुलीच्या आईने या गुन्ह्याविरोधात पोलीसचौकीत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी शोध घेतला असता तिच्या प्रियकरानेच त्या मुलीची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून याबाबत कसून चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
ज्यांच्या नावे १०० कोटींची खंडणी वसूल केली जात होती तो नंबर १ म्हणजे ‘हा’ माणूस; न्यायालयात खुलासा
ब्रेकींग न्युज! शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई
ठाणे शहरात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तूळात खळबळ; आनंद दिघेंच्या हत्येबाबतचा उल्लेख