Share

बैलगाडा शर्यतीसाठी मर्सिडीज गाडी बक्षीस देणार, पण ‘या’ अटीवर…; नितेश राणेंची घोषणा

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर आता बैलगाडी शर्यत हा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या गावोगावी यात्रा सुरू आहेत, यानिमित्ताने अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात आहेत. अशावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बैलगाडी शर्यतीसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी घोषणा केली ती आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीसंदर्भात. त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या विजेत्याला मोठं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी त्यांनी एक अट देखील घातली आहे.

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंवरून बैलगाडी शर्यतीची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा व्हिडीओ २२ सेकेंदाचा आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या विजेत्याला मोठं बक्षीस देण्यासंदर्भात आहे.

नितेश राणे यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब होतील, त्या वर्षी महेश लांडगे दादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून एक मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल.

देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत महेश लांडगे यांनी पुण्यातील वळगाव-चिखली याठिकाणी आयोजित केली होती. बैलगाडी शर्यत बघण्यासाठी असंख्य बैलगाडी हौशे उपस्थित होते. पाच दिवस ही बैलगाडी शर्यत सुरू होती, काल म्हणजेच 31मे ला त्याचा शेवटचा दिवस होता. जवळपास 2 कोटी रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आले होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस देखील हजर होते, बैलगाडी शर्यतीसाठी आपण २०१४ साली कायदा केला होता. परंतु पुन्हा तो कोर्टात गेला. त्यावेळी न्यायालयाने सांगितल की बैल हा पळणारा प्राणी नाही. त्यानंतर याबद्दल अहवाल तयार केला, तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर त्यांनी मान्य केलं की बैल हा पळणारा प्राणी आहे. त्यानंतर बैलगाडी शर्यत सुरू झाली. मात्र यापुढेही बैलगाडी सुरू राहणार असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

राजकारण

Join WhatsApp

Join Now