Share

“फडणवीसांना बोलता येत नाही म्हणून त्यांनी कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत”

rane family fadanvis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना त्यांनी शरद पवारांशी याबाबत चर्चा झाली होती, असे म्हटले आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेही एकमेकांवर टीका करत आहे.

देवेंद्र फडणवीस हे असत्याचा आधार घेऊन विधान करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली होती. आता शरद पवारांच्या प्रतिक्रियेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता त्या टिकेला राष्ट्रवादीचे युवानेते मेहबूब शेख यांनी उत्तर दिले आहे.

नितेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही. पवार कुटुंब हे नासक्या मेंदूचं आहे. आयुष्यभर त्यांनी टोप्या लावायचं काम केलं आहे. मी मागे बोललो होतो की फडणवीस साहेब जेव्हा शपथविधीबद्दल बोलतील तर पवारांना तोंड लपवायला जागा उरणार नाही.

आता नितेश राणेंच्या या टीकेला मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, राणे पवारांच्या नावाने टीका करुन स्वत:ची पोळी भाजून घेत आहे. पवारांवर टीका केली म्हणजे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल. यामुळे कोकणातील कोंबडे कायम ओरडत असतात.

तसेच पुढे ते म्हणाले की, राणे कुटुंब हे स्वत:च सडक्या मेंदूचं आहे. हे सगळा महाराष्ट्र जाणून आहे. विश्वासघात हा राणे कुटुंबाच्या रक्तातच आहे. देवेंद्र फडणवीसांना जे बोलता येत नाही, त्यासाठी त्यांनी कोंबडी चोर भाड्याने ठेवले आहेत.

तसेच ज्या शरद पवारांच्या हस्ते स्वत:च्या हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्याच पवारांच्या नावाने टीका करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायचे काम राणे कुटुंबाकडून केले जात आहे. आपल्याकडे लक्ष वेधले जाईल यासाठी कोकणातील कोंबडे ओरडत आहे, असा टोलाही मेहबूब शेख यांनी राणे कुटुंबियांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाला मोठा धक्का, ‘तो’ महत्वाचा दाखला न्यायालयाने नाकारला
‘माझ्यावर रेप होत होता, तेव्हा मी स्वत:च त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग करत होते,’ पीडितेचा जबाब ऐकून न्यायालय हादरले
अल्लाह आणि ओम एकच..; मौलाना अर्शद मदनींच्या वक्तव्यानंतर उडाला गोंधळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now