megha ghadge on gautami patil | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील तिच्या लावणीमुळे चांगलीच चर्चेत असते. अनेक ठिकाणी ती कार्यक्रम करताना दिसत आहे. पण तिच्या नृत्याच्या शैलीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. लावणीच्या नावावर गौतमी पाटील अश्लीलतेचे प्रदर्शन करते असे म्हणत तिच्यावर टीका केली जात आहे.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील अंगावर पाणी ओतून अश्लील डान्स करताना दिसली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अशात गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात एक मृतदेह आढळला होता. त्यामुळेही ती चर्चेत आली होती.
आता बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी गौतमी पाटीलच्या लावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. मेघा घाडगे सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असतात. त्या अनेकदा फेसबूक लाईव्ह सुद्धा येत असतात. आता एका फेसबूक लाईव्हदरम्यान त्यांनी गौतमी पाटीलवर प्रतिक्रिया दिली आहे.
खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. लावणी क्वीनचा किताब आज तुला मिळाला आहे. आमच्याकडून चूक झाली. आम्हाला माहिती नव्हतं की लावणी अशी असते. आमच्या पूर्वजांना सुद्धा असं काही माहिती नव्हतं. आम्हाला चुकीचं शिकवलं गेलंय, असं आम्हाला आता वाटायला लागलं आहे, असे मेघा घाडगे यांनी म्हटले आहे.
विनाकारण लोककलावंतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले, पण आत्ता माझे डोळे उघडले आहे. मीही पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन, असेही मेघा घाडगे यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, काल तर प्रेक्षकांच्या गर्दीत एकाचा जीव गेलाय. ऐकून खुप वाईट वाटलं. पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकारी बघायला कोणाला नाही आवडणार? त्यामुळेच मी म्हणतेय पिक्चर अभी बाकी है. सध्या मेघा घाडगे यांची प्रतिक्रिया सोशल मीडिया खुप व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
Ajit Pawar : “फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी केला होता, तेव्हा ती बेईमानी नव्हती का?”
८ जवान सुरक्षेसाठी तैनात तरीही अमृतसरमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?
China: चीनमुळे अनेक देश अडचणीत, २३ टनांचे रॉकेट झाले अनियंत्रित, भारत अमेरिकालाही भीती