आपल्या बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची एक झलक पाहायला चाहते नेहमी आतुर असतात. तसेच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अभिनेत्रींनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मात्र फक्त याच दशकात नाहीत तर मागील अनेक दशकापासून सुरू आहे. याची सुरुवात ५० ते ६० दशकापासून सुरुवात झाली आहे. यादरम्यान बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री मीना कुमारी यांची क्रेझ होती.
त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असायचे. त्यांनी त्यांच्या कलाकार एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. मीना कुमारी यांनी त्यांच्या दशकातील प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले होते. प्रत्येक अभिनेत्यासोबत त्यांची जोडीही खूप पसंत केली गेली.
मीना कुमारी या पडद्यावर जितक्या आनंदी असायच्या तितक्याच त्या पडद्यामागे दुःखी असायच्या. त्यामुळे लोक त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणायचे. मीना कुमारी यांनी ‘पाकीजा’, ‘बैजू बावरा’, ‘दिल अपना’ आणि ‘प्रीत पराई’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. जे त्याकाळात हिट ठरले होते.
या चित्रपटांशिवाय मीना कुमारी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आल्या होत्या. अगदी लहान वयात मीना कुमारी यांनी त्यांच्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक कमल अमरोही यांच्याशी विवाह केला. दोघांच्या वयात मोठा फरक होता. पण माध्यमांच्या माहितीनुसार, लग्नानंतर मीना कुमारी यांचे नाव धर्मेंद्र आणि प्रसिद्ध लेखक गुलजार यांच्यासोबतही जोडले गेले. जे त्या काळात खूप चर्चेत होते.
मीना कुमारी यांना कविता आणि शायरी लिहिण्याची खूप आवड होती. इतकेच नव्हे तर त्यांनी कैफी आझमी यांच्याकडून कवितेचे गुणही शिकून घेतले. याच छंदामुळे मीना कुमारी गुलजार यांच्या जवळ आल्या. तसेच ‘बेनजीर’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांची मैत्री झाल्याचे बोलले जात होते. काही काळानंतर मीना कुमारी आणि कमल अमरोही यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली.
मीना कुमारी यांच्या कविता पती कमाल अमरोही यांना कधीच आवडले नाहीत. पण गुलजार हे नेहमीच त्यांच्या कवितेचे खूप कौतुक करायचे. महत्वाचे म्हणजे मीना कुमारी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्यांना लिव्हर सोरायसिस नावाच्या आजार झाला होता.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी गुलजार यांच्यामुळेच ‘मेरे अपने’ हा चित्रपट साईन केला होता. या आजारपणामुळे त्या या चित्रपटाचे चित्रीकरण करू शकल्या नाहीत. पण गुलजार यांच्या सांगण्यावरून मीना कुमारी यांनी कसाबसा हा चित्रपट पूर्ण केला. तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सर्व कविता गुलजार यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यानंतर गुलजार यांनी देखील या सर्व कविता आणि शायरी ‘मीना कुमारींची शायरी’ या नावाने प्रकाशित केल्या.