उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींचा (Mayawati) पक्ष बीएसपीचा सुपडा साफ झाला आहे. यूपी निवडणुकीतील दारूण पराभवानंतर मायावतींनी आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी त्यांनी ट्विट करून बहुजन समाज पक्षाचे सर्व प्रवक्ते यापुढे कोणत्याही टीव्ही चर्चेत भाग घेणार नसल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमांवर जातीयवादी वृत्तीचा आरोप केला आहे.( Mayawati’s big decision)
मायावतींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यान मीडियाने आपल्या मालकाच्या आदेशानुसार जातीय द्वेष आणि द्वेषपूर्ण वृत्ती अंगीकारून आंबेडकरवादी बसपा चळवळीला नुकसान पोहोचवण्याचे काम जे केले आहे ते कोणापासूनही लपलेले नाही. या स्थितीत पक्षाच्या प्रवक्त्यांनाही नवी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व प्रवक्ते, श्री. सुधींद्र भदौरिया, श्री. धरमवीर चौधरी, डॉ. एम. एच. खान, श्री. फैजान खान आणि श्रीमती सीमा कुशवाह हे यापुढे टीव्हीवरील वादविवादात भाग घेणार नाहीत.
निवडणुकीच्या निकालानंतर मायावती म्हणाल्या होत्या, यूपी निवडणुकीचा निकाल हा बसपाच्या अपेक्षेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपण निराश होता कामा नये. त्याऐवजी, आपण त्यातून शिकले पाहिजे, आत्मपरीक्षण करून आपल्या पक्षाची चळवळ पुढे नेली पाहिजे आणि सत्तेत परत आले पाहिजे. 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात भाजपचा फारसा वाटा नव्हता. त्याचप्रमाणे आज काँग्रेसही भाजपसारख्याच टप्प्यातून जात आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल हा आपल्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा धडा आहे. बसपाविरोधातील नकारात्मक प्रचारामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मायावतींचा पक्ष बसपाला यूपीतील 403 विधानसभा जागांपैकी केवळ एक जागा जिंकता आली आहे. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 19 जागा मिळाल्या होत्या.यावेळी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 13 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत.
खरेतर, शुक्रवारी 11 मार्च रोजी सकाळी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत असताना मायावती म्हणाल्या की जर बसपाला मुस्लिम आणि दलितांची मते मिळाली असती तर भाजपचा पराभव झाला असता. यावेळी मायावती म्हणतात की, ही निवडणूक बसपासाठी धडा म्हणून पहिली गेली असती. बसपाविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे.
मायावती पुढे म्हणाल्या की, बहुजन समाज पक्षाच्या समर्थकांना सांगू इच्छिते की, आपण हिम्मत हारू नये आणि आता आपल्याला धीर धरावा लागेल. बाबासाहेबांचे अनुयायी कधीही हार मानणार नाही. त्याचबरोबर वाईट काळ लवकरच संपणार असल्याचेही मायावती म्हणाल्या. अथक प्रयत्न करूनही तोच निकाल लागला आहे, आता यापेक्षा वाईट काय असू शकते?
महत्वाच्या बातम्या-
सहा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; पीएफ वरील व्याजात प्रचंड घट
द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है
VIDEO: जबरदस्त ऍक्शन स्टंट करताना दिसली दिशा, व्हिडीओ पाहून लोकांनी काढली टायगरची आठवण
काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षही ठरला!, सोनियांनी दिला राजीनामा पण