आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी मयंक अग्रवालकडे(Mayank Agarwal) आली आहे. पंजाब संघाने आतापर्यंत एकही आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही, त्यामुळे मयंकच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. क्रिकेटर असण्यासोबतच मयंक करोडोंच्या बिझनेसचाही मालक आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य खूप मनोरंजक आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि कामाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेवूया.(mayank-agarwal-owns-crores-of-rupees-father-in-law-is-dgp-father-is-ceo)
मयंकचा जन्म 16 फेब्रुवारी 1991 रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. त्याचे वडील अनुराग अग्रवाल हेल्थकेअर कंपनीचे(Healthcare Company) सीईओ आहेत, तर आई सुचित्रा सिंग गृहिणी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मयंक अग्रवालची एकूण संपत्ती सुमारे 3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, जी भारतीय चलनात सुमारे 26 कोटी आहे.
त्याने बीसीसीआयचा(BCCI) पगार, आयपीएल करार आणि त्याच्या वैयक्तिक व्यवसायातून एवढी मोठी रक्कम गोळा केली आहे. मयंक अग्रवाल बेंगळुरूमध्ये(Bangalore) एका आलिशान डिझायनर घराचा मालक आहे. तसेच, मयंक अग्रवालकडे देशभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. मयंककडे जगातील काही सर्वोत्कृष्ट लक्झरी कार आहेत, त्याच्या गाड्यांच्या संग्रहात मर्सिडीज एसयूव्हीचाही समावेश आहे.
मयंक अग्रवालने त्याची बालपणीची मैत्रिण आशिता सूदशी जून 2018 मध्ये लग्न केले, जी वकील आहे. आशिताचे वडील प्रवीण सूद हे पोलिस आयुक्त आहेत, तर सध्या ते कर्नाटकचे डीजीपी आहेत. मयंक अग्रवालने आतापर्यंत 16 कसोटी सामन्यांमध्ये 43.30 च्या सरासरीने 1429 धावा केल्या आहेत. मयंकने 4 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत.
मयंकची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 243 धावा आहे. मयंकने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 28 षटकार आणि 178 चौकार मारले आहेत. त्याची एकदिवसीय कारकीर्द खूपच लहान आहे, मयंकने टीम इंडियासाठी फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 17.2 च्या सरासरीने फक्त 86 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 32 धावा आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 100 सामने खेळले आहेत. मयंकने 23.41 च्या सरासरीने 2131 धावा केल्या आहेत.