Krushna yadav : कमाल; लोणचे विकून अशिक्षित महिलेने उभारले करोडोंचे साम्राज्य, वाचा प्रेरणादायी कहाणी

एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला तर त्याला त्यात यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हेच दिल्लीतील नजफगढ येथे राहणाऱ्या कृष्णा यादव या महिलेने हे सिद्ध केले आहे. त्यांनी एका छोट्या खोलीत लोणचे बनवण्याचे काम सुरू केले आणि आज १०० हून अधिक महिलांना त्या रोजगार देत आहे.

आज कृष्णा यादव या महिलेची उलाढाल ५ कोटींहून अधिक आहे. विशेष म्हणजे निरक्षर असूनही कृष्णाने आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. कृष्णा यादव यांची ८ मार्च २०१६ रोजी भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने २०१५ नारी शक्ती सन्मानासाठी निवड केली होती.

कृष्णा यादव या ‘श्री कृष्णा पिकल्स’च्या मालकीण आहेत आणि आज ४ लहान युनिट्स चालवत आहेत. यामध्ये लोणच्याशी संबंधित १५२ उत्पादने बनवली जातात. मात्र, कृष्णा यादव यांना हे पद सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची आहेत. १९९५-९६ मध्ये त्यांचे कुटुंब आर्थिक संकटातून जात होते आणि त्यांचा बेरोजगार पती गोवर्धन यादव मानसिक त्रासातून जात होता. मात्र कृष्णा यादव यांनी या वाईट काळात आपल्या चिकाटीने आणि धैर्याने कुटुंबाला हाताळले.

त्यानंतर, कृष्णाने ओळखीच्या व्यक्तीकडून ५०० रुपये उसने घेतले आणि कुटुंबासह त्या दिल्लीला आल्या. तिला दिल्लीत काही काम मिळालं नाही तेव्हा तिचा नवरा गोवर्धन यादव आणि तिने थोडी जमीन घेऊन भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. बाजारात भाजीपाल्याचे भाव कमी होते, त्यामुळे २००१ मध्ये त्यांनी उजवा येथील कृषी विज्ञान केंद्रात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचे ३ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर त्यांनी आपल्या शेतातील भाजीपाल्यापासून लोणची बनवण्यास सुरुवात केली. १०० किलो मिरचीचे लोणचे आणि ५ किलो मिरचीचे लोणचे ३ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत तयार केले, ते विकून ५२५० रुपयांचा नफा त्यांना झाला.

कृष्णाने लोणची बनवायला सुरुवात केली, पण विकण्यासाठी बाजारापेठेतील दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी स्वत: मार्केटिंग सुरू केले आणि रस्त्यावरच लोणचे विकण्यास सुरुवात केली. दर्जेदार असल्याने हळूहळू त्याचे लोणचे विकू लागले.

त्यानंतर त्यांचे लोणचे इतके प्रसिद्ध झाले की आज कृष्ण यादव हे ‘श्री कृष्ण पिकल्स’च्या मालकीन आहेत आणि त्यांची उलाढाल ५ कोटींहून अधिक आहे. कृष्णा यादव स्वतः कधीच शाळेत गेल्या नाहीत, पण आज त्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या की, त्यांना दिल्लीच्या शाळांमध्ये विशेषतः मुलांना व्याख्यान देण्यासाठी बोलावले जाते.

मुलांकडून त्या स्वतःचे नाव लिहायला शिकल्या असल्या तरी त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज त्यांच्या ४ कंपन्या आहेत. दोन हरियाणात तर दोन दिल्लीत आहेत. ४ कोटींहून अधिक उलाढाल आहे. त्यांच्या कंपन्या लोणच्यासह मसाले, रस, तेल, पीठ तयार करतात.

शेकडो लोकांना ती रोजगार देत आहे. कृष्णा यादव यांची ८ मार्च २०१६ रोजी भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने २०१५ नारी शक्ती सन्मानासाठी निवड केली होती. २०१४ मध्ये, हरियाणा सरकारने कृष्णा यादव यांना इनोव्हेटिव्ह आयडियासाठी राज्याचा पहिला चॅम्पियन किसान महिला पुरस्कार देऊन सन्मानित केले.