Share

PHOTO: पिवळ्या साडीमध्ये मौनी रॉयला पाहून चाहता घायाळ; म्हणाला, ‘तुझ्यासारखं या जगात कोणीच नाही’

आपल्या भारत देशात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लागले आहे. अभिनेत्रीची एक अदा पाहण्यासाठी चाहते अभिनेत्रीला प्रत्येक ठिकाणी फॉलो करत असतात. चाहत्यांचे प्रेम आणि अभिनयाच्या जोरावर कलाकार यशाचे शिखर घाठतात. अशीच एक अभिनेत्री आहे जीने स्वतःच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.

 

त्यानंतर छोट्या पडद्यावर एक अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. ही अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. मौनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. ती एक उत्तम गायिका आणि कथ्थक नृत्यांगना आहे. मागील अनेक दिवसांपासून मौनी नेहमी चर्चेत आहे. मागील महिन्यातच मौनीचे लग्न सूरज नांबियारसोबत झाले. सूरज हा एक मोठा उद्योगपती आहे.

मौनी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. लग्नानंतर मौनीच्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे. लग्नानंतर ती अजूनच सुंदर दिसत आहे. तिची ही सुंदरता तिच्या नुकताच शेअर केलेल्या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अजूनच तिचे दिवाणे झाले आहेत. या फोटोमध्ये मौनी अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे.

 

तिने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. त्याचबरोबर केसांची वेगळीच वेणी देखील घातली आहे. तिच्या या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मौनाचे हे फोटो खूप कमी वेळात वेगाने व्हायरल होत आहेत.

मौनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात ही दिसून येणार आहे. त्याचबरोबर अगोदर ही तिने २०१८ मध्ये अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘गोल्ड’ या चित्रपटात ही काम केले आहे. त्यानंतर ‘मेड इन चायना’ या देखील चित्रपटात तिने काम केले आहे. त्याचबरोबर ती काही दिवसांतच ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर ५’ या शोमध्ये दिसणार आहे. ती या शोची परीक्षक असणार आहेत.

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now