‘४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच,’ असा इशारा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी औरंगाबादमध्ये बोलताना दिला आहे. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे.
राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेनंतर आता मुस्लीम समाजातून आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘राज ठाकरेंनी कितीही अल्टीमेटम दिले तरी मुस्लिम समाज भोंगे उतरवणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका ऑल इंडिया इमाम कॅऊन्सिल चे स्टेट रेसिडेंट मौलाना दौलत नदवी यांनी घेतली आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी थेट राज यांना लक्ष केलं असून त्यांनी दिलेल्या अल्टीमेटम भाष्य केलं आहे. ‘राज ठाकरे आणि त्यांच्या सोबत एकूण चालणारे हे आमच्या पायाखालच्या धुळी समान आहे, अशी जहरी टीका मौलाना दौलत नदवी यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला जातील त्यांचे ते हात परत येतील का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज ठाकरेंना काळजी घेण्याची आवाहन केले आहे. याचबरोबर राज ठाकरेंच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. हिंदूंचे लीडर दाखवून देण्यासाठी मुस्लिम समाजाला राज ठाकरे टारगेट करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, ‘राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे हिंसेला निमंत्रण आहे. याची पोलिस स्वत:हून दखल का घेत नाहीत? असा सवाल उपस्थित करत एआयएमआयएम(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. औवेसी यांनी राज यांच्या अटकेची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करणाऱ्या नवनीत आणि रवी राणा यांच्यावर कारवाई होऊ शकते, तर राज ठाकरेंवर कारवाई का होऊ शकत नाही?, असा संतप सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
“भोंगे काढल्याने आणि हनुमान चालिसा म्हटल्याने नवनिर्मान नाही तर महाराष्ट्र उद्धवस्त होईल”
मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा; म्हणाले, ईद म्हणजे, दयाभाव आणि…
राजेंद्र पवारांचा कृषीरत्न पुरस्कार स्विकारण्यास नकार; राज्यपालांवर केले ‘हे’ गंभीर आरोप
पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट