Share

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक; आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आईचे म्हणजेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रेखाताई यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना वाचविण्यामध्ये डॉक्टरांना अपयश आले. रेखाताई यांच्या अशा जाण्याने क्षीरसागर कुटुंबात शोककळा पसरली आहे. रेखाताई यांच्यावर गुरुवारी नवगण राजूरी येथील मळ्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

रेखाताई यांच्या कुटुंबात पती गजानन कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुले आमदार संदीप क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांचा समावेश आहे. आता रेखाताई यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान रेखाताई क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. त्यांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. रेखाताई यांच्या निधनाची अधिकृत घोषणा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केली.

यानंतर त्यांना शेवटचे पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली.
रेखाताई या धार्मिक वृत्तीच्या होत्या. अध्यात्म आणि योगाच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागात दौरे केले. त्यांनी नवगण राजूरीच्या सरपंचपदी अनेक वर्षे काम केले होते.

महत्वाच्या बातम्या
भक्तगणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारणार भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर
दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही – कुस्तीपटू बबिता फोगाट
‘देशातील वाढत्या महागाईवर पंतप्रधान मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे’
गळ्यात सोन्याची साखळी, महागड्या गाड्यांचा छंद, जहांगीरपुरमध्ये गुंडागर्दी; वाचा मोहम्मद अन्सारीबद्दल..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now