dinesh kartik : ट्वेंटी विश्वचषक 2022 दरम्यान टीम इंडियाकडून एक वाईट बातमी येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान संघाचा मोठा मॅचविनर खेळाडू जखमी झाला आहे. तथापि, या खेळाडूची दुखापत अद्याप किती गंभीर आहे हे समजले नाही. हा खेळाडू म्हणजे विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आहे.(South Africa, India, India Team, Defeat, Rohit Sharma, Dinesh Karthik)
दक्षिण आफ्रिका खेळत असताना दिनेश कार्तिकला दुखापतीमुळे मैदानातून बाहेर जावे लागले. दिनेश कार्तिकला सामना सुरू असतानाच मैदान सोडावे लागले. दिनेश कार्तिकला दुखापत झाल्यानंतर रिषभ पंतने विकेटकीपरची जबाबदारी सांभाळली. पुढील सामन्यापूर्वी दिनेश कार्तिक तंदूरूस्त झाला नाही तर प्लेईंग 11 मध्ये रिषभ पंत खेळताना दिसू शकेल.
दिनेश कार्तिकने अद्याप टी -20 विश्वचषक 2022 मध्ये आपली छाप पाडली नाही. दिनेश कार्तिकने खेळल्या गेलेल्या 2 डावांमध्ये 3.50 च्या सरासरीने केवळ 7 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 चेंडूंचा सामना केला, परंतु तो 40 च्या स्ट्राइक रेटने केवळ 6 धावा करू शकला.
डेव्हिड मिलर (59 नाबाद) आणि एडेन मार्करामच्या चमकदार अर्धशतकांमुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले. नऊ विकेट्स गमावून भारताने 133 धावा केल्या होत्या.प्रत्यूत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19 .4 षटकांत 134 करत विजय मिळवला. भारतासाठी अरशदीप सिंग यांनी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने रविवारी टी -20 विश्वचषकात भारताला 5 विकेटने पराभूत केले. पर्थच्या वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टीम इंडियाची दुखरी बाजू उघडकीस आली. रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला.टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर अक्षरश गुडघे टेकले. सूर्यकुमार वगळता, इतर कोणताही भारतीय फलंदाज वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी
gujarat : गुजरातमध्ये मृत्यूचे तांडव! नदीत पूल कोसळून १५० लोकं बुडाले, आतापर्यंत ३५ मृतदेह बाहेर काढले
Gautami Patil : आपल्या घायाळ अदांनी महाराष्ट्राला वेड लावणारी लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या