हस्तमैथुन करणं एका 20 वर्षीय मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे त्याला जवळपास आठवडाभर रुग्णालयात काढावे लागले. ही घटना स्वित्झर्लंडमध्ये घडली आहे. तरुणाला हस्तमैथुन करत असताना फुफ्फुसाला गंभीर इजा झाली, त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रिपोर्टनुसार, हस्तमैथुन करत असताना बेडवर पडलेल्या तरुणाच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, त्याच्या छातीत प्रचंड दुखत असल्याने त्याला तातडीने इमरजेंसी रूममध्ये नेण्यात आले.
तरुणाची तपासणी केली असता डॉक्टरांना आढळून आले की, रुग्णाचा चेहरा सुजलेला होता, श्वास घेताना आणि बाहेर काढताना वेगवेगळे आवाज येत होते. तरुणाच्या केस हिस्ट्रीवरून असे दिसून आले की त्याला सौम्य दम्याचा देखील त्रास होता.
तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळले की तरुणाला सौम्य दम्याचा त्रास होता. रुग्णाच्या छातीच्या एक्स-रेमध्ये न्यूमोमेडियास्टिनमनावाची दुर्मिळ स्थिती असल्याचे दिसून आले. त्याला फुफ्फुसामध्ये गंभीर इजा झाली होती. त्यामुळे या तरुणाला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता होती.
फुफ्फुस किंवा अन्ननलिकेला दुखापत झाल्यामुळे न्यूमोमेडियास्टिनम होऊ शकतो. जेव्हा छातीत अचानक दाब वाढतो तेव्हा देखील हे अचानक होऊ शकते. अशा परिस्थितीत, फुफ्फुसातील काही पडदे देखील फुटू शकतात, ज्यामुळे हवा बाहेर पडते. अशी दुखापत तरुण मुलांमध्ये होण्याची दाट शक्यता असते.
दरम्यान, तरुणाला रुग्णालयात अतिदक्षता रूममध्ये(ICU) निरीक्षणाखाली ठेवले होते. त्याचे छातीत दुखायचे कमी व्हावे यासाठी त्याला एंटीबायोटिक्स दिल्या. या तरुणाला वेळेत आणि योग्य उपचार मिळाल्याने तो लवकर बरा झाला, आणि मृत्यूच्या दारातून मागे आला. त्याला सात दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.