एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मात्र, परिसरातील लोकांनी घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला असून, घडलेल्या प्रकरणाबद्दल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
संबंधित घटना ही उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमधील खागलपूर याठिकाणी घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत, मात्र या पाच जणांची एवढ्या निर्घृणपणे हत्या का करण्यात आली याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात आई वडील आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असून, त्यांची गळा चिरून हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव राहुल तिवारी असून, तो 42 वर्षांचा आहे. तर त्याच्या मृत पत्नीचे नाव प्रीती असून, तिचं वय 38 वर्ष आहे. या दोघांच्या तीन मुलींची देखील अशा पद्धतीने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
मृत पावलेल्या मुलींची नावं माही, पीहू आणि पोहू अशी आहेत. हे कुटुंब खागलपूर येथील एका भाड्याच्या घरात राहत होते. हे कुटुंब मुळचे कौशांबी येथील आहे. प्रयागराजमधील या घटनेचे दृश्य थरारक होते. राहुल तिवारीचा मृतदेह बाथरूममध्ये दिसून आला.
तर, तीन मुली आणि पत्नीचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह बेडवरती पडलेले होते. पत्नी आणि मुलींच्या शरीरावर जखमा होत्या, मात्र पतीच्या शरीरावर मारहाणीच्या काही जखमा नव्हत्या. मात्र त्याच्या हाताला आणि कपड्यांना रक्ताचे डाग दिसून आले.
या प्रकरणाचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. घटनास्थळावरून काही माल चोरीला गेलाय का, याचाही तपास सुरु आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण झाले. याआधी पाच महिन्यांपूर्वी एका कुटुंबातील चौघांचा अशाच प्रकारे कुऱ्हाडीने गळा कापून खून करण्यात आला होता. ही घटना मोहनगंज फुलवरिया येथे घडली होती.