देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) गेल्या वर्षी सणासुदीच्या मुहूर्तावर आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती सेलेरियो (Maruti Celerio) लाँच केली होती. या छोट्या कारला कंपनीने पेट्रोल इंजिन आणि कंपनी फिटेड सीएनजी किट बसवले आहे. या छोट्या कारने बाजारात येताच चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.(Maruti’s Celerio gives 35 km mileage)
फेब्रुवारी महिन्यात या हॅचबॅक कारला 9 हजारांहून अधिक ग्राहक मिळाले आहेत. कमी किंमत, उत्तम फीचर्स आणि उत्तम मायलेज यामुळे ही कार बर्याच काळापासून बाजारात लोकप्रिय आहे. विक्रीच्या आकड्यांचा विचार करायचा झाला तर, कंपनीने फेब्रुवारीमध्ये Celerio च्या एकूण 9,896 युनिट्सची विक्री केली आहे. जे गेल्या वर्षीच्या जुन्या मॉडेलच्या विक्रीपेक्षा 59.25 टक्के अधिक आहे.
गेल्या वर्षी कंपनीने आपल्या जुन्या मॉडेलच्या एकूण 6,214 युनिट्सची विक्री केली होती. आता कंपनीने आपले फेसलिफ्ट मॉडेल नवीन फीचर्स, अपडेट्स आणि नवीन तंत्रज्ञानासह सादर केले आहे. नवीन मारुती सेलेरियो कंपनीच्या पाचव्या पिढीतील हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ब्रेक असिस्ट, सेगमेंट-फर्स्ट हिल-होल्ड असिस्ट इत्यादींसह उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
फायर रेड आणि स्पीडी ब्लू या दोन नवीन रंगांसह एकूण 6 रंगांमध्ये ही कार ऑफर करण्यात आली आहे. इतर रंगांमध्ये, तुम्हाला सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टरिंग ग्रे, आर्क्टिक व्हाइट आणि कॅफीन ब्राउन मिळेल. कंपनी या कारमध्ये 1.2-लिटर क्षमतेचे K12N पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे जे DualJet, Dual VVT तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि 65hp पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. नवीन K-Series पेट्रोल इंजिन आणि सुधारित तंत्रज्ञानाने सुसज्ज ही कार सुमारे 26.68 किलोमीटर प्रतिलीटरचा मायलेज देते. त्याच वेळी, त्याचे CNG वेरिएंट 35.60 किमी/किलो पर्यंत मायलेज देते. कारला 313 लीटर सामानाची जागा मिळते, जी मागील मॉडेलपेक्षा 40% जास्त आहे.
कारच्या बाहेरील भागात होरिजोंटल क्रोम स्लेट आणि मध्यभागी सुझुकी बॅज (LOGO) असलेला नवीन ग्रिल विभाग आहे. हनीकॉम्ब इन्सर्ट, बल्बस हेडलॅम्प क्लस्टरसह नवीन बोनेट स्ट्रक्चर या कारच्या पुढील भागाला अधिक चांगला लुक देते. मोठ्या आकारामुळे कारच्या आत केबिनमध्येही चांगली जागा उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या-
Top 5 South Gossips of the Day: २ दिवसात राधे श्यामचा तब्बल एवढ्या कोटींचा गल्ला, RRR चे महत्वाचे सीन्स लीक
१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले , काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले
नोकरीची चिंता सोडा, एकदाच लावा हे रोप, आयुष्यभर कमवा लाखो रुपये
विवेक अग्निहोत्रींना याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावे लागतील, मनोज मुंतशिरचं ट्विट चर्चेत