Share

२६/११ ला शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांची कथा रुपेरी पडद्यावर, ‘Major’ चा ट्रेलर झाला रिलीज

Major

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ (Major) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात मेजर उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते २६/११ च्या मुंबईत झालेल्या आंतकवादी हल्ल्यात त्यांच्या जीवाचे बलिदान देण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. नुकतीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

या ट्रेलरमध्ये सुरूवातीला काश्मीरमधील एक सीन दाखवण्यात आला आहे. यामध्ये संदीप उन्नीकृष्णन यांना विचारण्यात येते की, ‘बॉर्डर पार करून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये का गेलात?’ त्यावर उन्नीकृष्णन म्हणतात की, ‘ते तर आपलंच आहे सर’. ट्रेलरमध्ये पुढे संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणाची झलक दाखवण्यात आली आहे.

बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असतो तर दुसरीकडे स्क्रीनवर मुंबईत झालेला हल्ला दाखवण्यात येतो. ट्रेलरमध्ये संदीप यांच्या कॉलेज जीवनापासून ते सेनेतील ट्रेनिंग, लव्ह लाईफ आणि पुढे मुंबई हल्ल्यात त्यांची वीरता दाखवण्यात आली आहे. ट्रेलर पाहून अनेकजण चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे कमेंटद्वारे सांगत आहेत.

‘मेजर’ (Major) या चित्रपटात अभिनेता अदिवी शेषने मेजर उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. आदिव शेषसोबत या चित्रपटात सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती, मुरली, शोभिता धूलिपाला मुख्य भूमिकेत आहेत. शशि किरण टिक्का यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

तेलुगूसोबत हा चित्रपट मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक मेगाबजेट चित्रपट असून सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनसोबत महेशबाबूच्या जीएमबी एंटरटेनमेंट आणि ए+एस मूव्हीजद्वारा या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. तर ३ जून रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सलमान खाननेसुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘मेजर’ (Major) चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले की, ‘मेजर चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आनंद होत आहे. हे खूपच अद्भुत आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा’. यासोबतच त्याने हॅशटॅगमध्ये लिहिले की, ‘जान दूंगा देश नहीं’.

महत्त्वाच्या बातम्या :
अमिषा पटेलने दिली संजय राऊत यांना ‘जादू की झप्पी’; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
आमिर खानच्या मुलीने बिकीनीवरच साजरा आपला वाढदिवस; बोल्ड फोटो पाहून लोकं म्हणाले..
देशातील शाळांना मुलांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं सक्तीचं करावं; अक्षयने सरकारकडे केली अजब मागणी

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now