धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? का केली विवाहित प्रेमी युगुलला गावकऱ्यांनी मारहाण?
ही घटना आहे झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड दोघेही विवाहित असून प्रेयसीला दोन आणि प्रियकराला तीन मुले आहेत. अनेक दिवसांपासून यांचे विवाह बाह्य प्रेम संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर गावकऱ्यांनी त्यांना पकडले.
याचबरोबर याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीचा नवरा घराबाहेर पडताच काही वेळाने प्रियकर तिच्या घरी जायचा. असे हे बरेच दिवस सुरु होते. हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. संधी मिळताच गावकऱ्यांनी या जोडप्याला आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. या घटनेत प्रेयसीचा डोळा सुजला असून धक्कादायक बाब म्हणजे तिचे कपडेही फाटले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण शिकारीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे समजत आहे. मारहाण करून गावकरी थांबले नाही. तर त्या दोघांनाही ढोल-ताशांच्या गजरात गावात फिरवण्यात आले.
दरम्यान, त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेमी युगुलाची सुटका केली. याचबरोबर आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.