Share

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी समुद्रकिनारी दिसली किस करताना; पहा व्हायरल फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी विदेशात गेली आहे. त्यात त्यांनी त्याठिकाणहून काही फोटो शेयर केले आहेत. त्यात तिथं हे कपल चील करतानाचे आणि सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. याशिवाय सोनाली आणि कुनाल हे एका फोटोमध्ये किस करतानाही दिसत आहे. त्यामुळं या फोटोंवर आता चाहत्यांनी काही भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

सोनाली आणि कुणाल यांचं गेल्या वर्षीच विदेशात लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांनी गुपचूप हनिमूनला जाण्याची निर्णय घेतला होता. परंतु यावेळी सोनालीनं हनिमूनला गेल्याचं लपवलेलं नाही. सोनाली आणि कुणाल हे मॅक्सिकोत हनिमूनला गेलेले आहेत.

तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी हॉट फोटोशूट देखील केलेलं आहे. सोनालीनं यातीलच काही फोटो शेयर केले आहेत. त्यात तिनं या फोटोंना en nuestra luna de miel असं मॅक्सिकन भाषेत कॅप्शन दिलं आहे. त्यामुळं त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर फार चर्चा रंगलेली आहे.

सोनालीने तिच्या हनीमून रिसॉर्टला ‘Adios’ म्हणत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोंची मालिका पोस्ट केली आहे. साइनबोर्डच्या बाजूने खांबासोबत पोझमध्ये सोनालीनं प्रिंटेड केशरी बिकिनी घातली होती. त्यात ती आपल्या पतीसोबत अतिशय आनंदात दिसत आहे.

सोनाली आणि कुणाल या दोघा कपलला किस करतानाचे फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. सोनाली आणि कुणालला किस करताना पाहून एका युजरनं लिहिलंय, ‘हे तर हाँलिवुड झालं, अशीच मराठी कलाकार मंडळींनी हाँलीवुडमध्ये जावं ही सदिच्छा.’ तर दुसऱ्या युजर्सने त्यांच्या प्रेमाचा सन्मान आणि आदर करायला हवा, असं सांगितलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये कुणाल आणि सोनाली हे समुद्रकिनारी किस करताना झोक्यांचा आनंद घेताना आणि पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात उष्णतेची लाट आलेली असताना या दाम्पत्यानं उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी मॅक्सिको पर्यटनाचा पर्याय निवडला की काय, अशीही शंका काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाते. नटरंग चित्रपटात केलेल्या भूमिकेसाठी तिचं प्रचंड कौतुक झालं होतं. अप्सरा आली या प्रसिद्ध गाण्यातही तिनं डान्स केलेला आहे. याशिवाय तिनं अनेक प्रसिद्ध आणि सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये आपल्या कार्याचा आणि कर्तुत्त्वाचा ठसा उमटवला आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now