मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेमा किरण या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठीसोबत हिंदी, गुजराती, भोजपुरी, अवशी अशा भाषेतील चित्रपटांतही काम करत तिथेही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ८०-९० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटातील आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.
यामध्ये ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘खेळ आयुष्याचा’, ‘गडबड घोटाळा’, ‘अर्धांगिणी’, ‘सासरची साडी’, ‘दे दणादण’, ‘गडबड घोटाळा’, ‘कुंकू झाले वैरी’, ‘धुमधडाका’, ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’, ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘माहेरचा आहेर’, ‘अर्जून देवा’ अशा चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
प्रेमा यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले होते. चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळत असत. लक्ष्याची हिरोईन म्हणून त्यांना जास्त प्रमाणात ओळखण्यात येत असत.
मोठ्या पडद्यासोबत प्रेमा यांनी छोट्या पडद्याद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांकडून कौतुक मिळवले होते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या निर्मात्यासुद्धा होत्या. त्यांनी ‘उतावीळ नवरा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
दरम्यान, प्रेमा यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे आपला शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
टॉपलेस होऊन गार्डनमध्ये फिरताना दिसली उर्फी जावेद, अचानक पलटली अन्…; हैराण करणारा व्हिडिओ आला समोर
पहिल्याच दिवशी अजय देवगणची क्रॅंश लँडिंग, runway 34 ने कमावले फक्त ‘एवढे’ कोटी
ऋषी कपूरचा विषय निघताच भावूक झाल्या नीतू कपूर, रडत-रडत म्हणाल्या, रोज कोणी ना कोणी..