Share

PHOTO: थाटामाटात पार पडला अलका कुबल यांच्या मुलीचा लग्नसोहळा, दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

alka kubals daughter ishani marriage

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा नुकताच विवाहसोहळा (Alka Kubals Daughter wedding)पार पडला. ईशानीने दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलका कुबेल यांच्या मुलीच्या लग्नात अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती, प्राजक्ता दिघे, स्मिता जयकर, अर्चना नेवरेकर, मिलिंद गवळी, निर्मिती सावंत असे कलाकार मंडळी उपस्थित होते. अर्चना नवरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ईशानीच्या लग्नासोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘ईशानी एवढसं लहान बाळ, मला अजूनही आठवते अलका ताई ईशानीला सेटवर आणायच्या. आज तिचा लग्न. विश्वास बसत नाही. मुले किती लवकर मोठी होतात. अलका ताई आणि समीरजींची झलक अगदी ईशानीमध्ये आहे. अतिशय प्रेमळ, हुशार आणि आईचे संस्कार दोन्ही मुलींमध्ये दिसतात. ईशानी आणि निशांत नवं दाम्पत्याला खूप खूप आशिर्वाद आणि प्रेम. शतजन्मी तुमचं प्रेम असाच राहू दे’.

त्यांनी पुढे लिहिले की, ‘जुनी मित्र मंडळी भेटली, खूप गप्पा रंगल्या. आज जणू दोस्तांची मैफिल रंगली. खूप हसलो. एकमेकांची टांग खेचली. खूप छान जेवण. लग्नसोहळा छान संपन्न झाला. अलका ताई आणि समीरजी खूप छान पाहुणचार. सासूबाई झालात, किती मस्त…’

दरम्यान, अलका कुबल यांनी मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहेत. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्यांना फार लोकप्रियता मिळाली. तसेच मराठीत त्यांनी ‘लेक चालली सासरला’, ‘वहिनीची माया’, ‘तुझ्या वाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ अशा अनेक चित्रपटातील आपल्या अभिनयाद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.

एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच अलका कुबल निर्मात्यासुद्धा आहेत. त्यांनी मराठीत ‘आम्ही का तिसरे’, ‘अग्निपरिक्षा’, ‘सुवासिनीची ही सत्वपरिक्षा’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय सध्या त्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेची निर्मिती करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘या’ कारणामुळे ‘अला वैकुंठपुरमलो’ सिनेमागृहात होणार नाही प्रदर्शित
अरे वा! पुष्पा’नंतर आता अल्लू अर्जुनच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटालाही आवाज देणार श्रेयस तळपदे

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now