गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भारतीय सिनेसृष्टीतील योगदा अतुलनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे. आज त्यांच्या जाण्याने देशात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने बॉलिवूडसोबत मराठी कलासृष्टीवरही शोककळा पसरली आहे. गानसरस्वती लता मंगेशकर यांना अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली (Marathi Celebrities Paid Tribute to Lata Mangeshkar)आहे.
अभिनेता भरत जाधवने लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक जुना फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले की, ‘पु. ल. एकदा आपल्या एका भाषणात म्हणाले होते की या आकाशात सूर्य आहे.. चंद्र आहे.. आणि लताचा स्वर आहे..!! दीदी तुम्ही.. तुमचा आवाज..आणि तुमच्या स्मृती अमर आहेत..! शतशः नमन!’
अभिनेत्री सई ताम्हणकरने लतादीदींचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले की, ‘तुम्ही नेहमी आमच्यासोबत असणार’.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिले की, ‘आपल्या आयुष्याचं पार्श्वसंगीत लतादीदींच्या आवाजात वाजत राहील.. कायम’.
https://www.instagram.com/p/CZoFlQOFgx_/
अभिनेता स्वप्निल जोशीनेही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.
सुबोध भावेने लिहिले की, ‘भारतरत्न लता मंगेशकर, साक्षात सरस्वती देवी. तुम्ही अमर आहात दीदी! तुमचे अलौकिक आणि पवित्र सूर आयुष्यभर आम्हाला सर्व प्रसंगात सोबत करतील. तुम्हाला आणि तुमच्यातल्या कलेला मनापासून नमस्कार. ओम शांती’.
अभिनेत्री मुक्ता बर्वेने केवळ लता दीदी असा शब्द लिहिलेला एक पोस्ट शेअर केला आहे.
चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले की, ‘रडताना, हसताना, प्रेमात पडताना, झुरताना, मुठी वळताना, आयुष्याचा एक कण आणि एक क्षण असा नाही जिथं तुमचा आवाज हजर नव्हता. Happy Onward Journey लता दिदी. तेरी आवाज ही तेरी पेहचान है’.
यासोबतच सिद्धार्थ चांदेकर, आदर्श शिंदे, प्रियांका बर्वे यांच्यासह इतर अनेक मराठी कलाकारही सोशल मीडियाद्वारे लता दीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शासकीय इसमामात लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत असून यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. यादरम्यान लता यांच्या पार्थिवासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. तसेच लता मंगेशकरांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक लोक शिवाजी पार्कवर पोहोचले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्राकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर, जाणून घ्या काय असतो राष्ट्रीय शोक?
लतादीदींच्या निधनानंतर बाॅलिवूड शोकसागरात; अनिल कपूर म्हणाले काळीज तुटलं..
…त्यामुळे मजरूह सुल्तानपुरी लतादीदींचे जेवण स्वत: चाखायचे, कारण वाचून हादरा बसेल