मराठी नाटक आणि चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. तर असाच एका पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. झी मराठीद्वारे देण्यात येणाऱ्या झी गौरव पुरस्कार २०२२ चा (Zee Maha Gaurav Puraskar 2022) सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक मराठी तारे-तारकांचा जलवा पाहायला मिळाला. रेड कार्पेवटर अनेक कलाकार ग्लॅमरस अवतारात दिसून आले.
या पुरस्कार सोहळ्यात मागील २१ वर्षात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी करण्यात आलेल्या महान कार्यासाठी २१ महत्त्वाच्या चित्रपटांचा झी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणाऱ्या स्वप्निल जोशी याने केले.
या कार्यक्रमासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरनेही हजेरी लावली. यावेळी तिने आपल्या न्यृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. तिच्या नृत्याविष्काराला कलाकारांकडून भरभरून दाद मिळाली. तिच्यासोबत विनोदवीर जॉनी लिवरसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते.
यासोबतच श्रेयस तळपदे, नागराज मंजुळे, प्रिया बापट, वैदेही परशुरामी, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, ललित प्रभाकर, केतकी माटेगावकर, सिद्धार्थ जाधव, संजय जाधव असे मराठी सिनेसृष्टीतील कलाकरांनाही या सोहळ्यास हजेरी लावली.
यावेळी या सर्व कलाकारांचा रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाज दिसून आला. या सोहळ्यादरम्यानचे या कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर या पुरस्कार सोहळ्यातील कलाकारांच्या लूकवर एक नजर टाकूया.
महत्त्वाच्या बातम्या :
काश्मिरी पंडितांवर बनलेला चित्रपटाच्या टीमने घेतली मोदींची भेट; चित्रपटाचे कौतूक करत मोदी म्हणाले…
जातीयवादी म्हणत ट्रोल करणाऱ्यांना नागराजने दिलं सर्वांची मनं जिंकणारं उत्तर; वाचून तुम्हीही कौतूक कराल
“द काश्मिर फाईल्स’ पाहून ढसाढसा रडली महिला, थेट पकडले दिग्दर्शकाचे पाय; म्हणाली…