मुंबई। टेलिव्हिजनवरील अनेक रियालिटी शो आपण पाहत असतो. त्यापैकी एक आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे मराठी ‘बिग बॉस’. आपल्यापैकी अनेक लोक या कार्यक्रमाची वाट बघत असतात. तसेच नित्य- नियमाने हा कार्यक्रम पाहत असतात. बिग बॉस मराठी या रियालिटी शो मध्ये कला विश्वातील अनेक कलाकार सहभागी होतात.
बिग बॉस या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना कला विश्वात नवं-नवीन संधी मिळतात. या कार्यक्रमानंतर अनेक कलाकारांचे आयुष्य बदलून जाते. त्यांना फिल्म, सिरीयल अशा अनेक मोठ्या संधी उपलब्ध होतात. दरम्यान आताच मराठी बिग बॉस पर्व ३ पार पडले. या पर्वाचे विजेतेपद विशाल निकम याने आपल्या नावावर केले.
विशाल निकमने मराठी बिग बॉस ३ ची ट्रॉफी तर जिंकलीच पण त्याचबरोबर त्याने लाखो प्रेक्षकांची मने देखील जिंकली. बिग बॉस मधील त्याच्या कामाला लोकांनी चांगलीच पसंती देऊन त्याला विजयी केले. बिग बॉस नंतर आता विशाल निकम पुन्हा टीव्ही वर झळकणार आहे. तो एका नव्या मालिकेतून पुन्हा एकदा टीव्हीवर दमदार एंट्री करणार आहे.
कलर्स मराठीवरील मालिका ‘आई मायेचं कवच’ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. मुलगी आणि आईच्या नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेने खूप कमी वेळात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘आई मायेचं कवच’ या मालिकेत आता एका नव्या चेहऱ्याची एंट्री झाल्याची दाखवण्यात आली आहे. या मालिकेतील नवीन चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून, मराठी बिग बॉस ३ चा विजेता विशाल निकम असणार आहे. या मालिकेत विशाल मानसिंग नावाची भूमिका साकारणार आहे.
या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये विशालची झलक दिसताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या मालिकेबद्दल विशालला विचारले असता त्याने या भूमिकेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.विशालने सांगितले, बिग बॉसनंतर पुन्हा एकदा टीव्हीवर येतोय याचा मला खूप आनंद आहे.
या मालिकेत मी मानसिंग नावाचे पात्र साकारत आहे. जबादारी खूप मोठी आहे कारण आजपर्यंत केलेल्या भूमिकांपैकी हि भूमिका खूप वेगळी आहे. तसेच या मालिकेत मोठं-मोठी कलाकार मंडळी आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायचा मी प्रयत्न करेल. या मालिकेतील माझे पात्र मी उत्तम प्रकारे पार पाडेल असे विशाल निकम म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? राऊतांचा MIM ला टोला
पुण्यात डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत अश्लील कृत्य; पार्सल देण्यासाठी आला आणि पॅन्टची चेन काढून…
‘द कश्मीर फाइल्स’मुळे पुन्हा वाद उफाळण्याची भीती; काश्मिरी पंडितांनी मांडलं रोखठोक मत