मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येत असते. सोशल मीडियावर ती अनेक वादग्रस्त पोस्ट किंवा व्हिडीओ टाकत असते. सध्या ती अशाच तिच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने यावेळी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, सध्या तिच्या या फेसबुक पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
वेगवेगळ्या मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडत असते. टोकाची मते लिहिल्याने अनेकदा केतकीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत टीका करणारी तिने फेसबुक पोस्ट केली आहे.
मध्यंतरी शरद पवार यांचे साताऱ्यातील एक भाषण प्रचंड गाजलं होतं. या भाषणावेळी शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कविता म्हटली. त्या कवितेत पवारांनी हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने केली.
याच भाषणाच्या पार्श्वभूमीवर केतकीने पवारांवर टीका केली. पवारांनी भाषणावेळी म्हटलेल्या कवितेचा धागा पकडून केतकीने पवारांना ब्राह्मणद्वेष्टा म्हटलं आहे. ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू, तू तर मच्छर, अशा खालच्या शब्दात तिने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
https://www.facebook.com/812055050/posts/10166554560880051/?app=fbl
तिने फेसबुक पोस्ट केली आणि लिहिले, तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड