Share

मराठी अभिनेत्री पूजा सावंत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर फिदा; म्हणाली त्याच्याशीच करायचय लग्न..

झी मराठी वाहिनीवर कमी कालावधीत लोकप्रिय झालेला कार्यक्रम ‘बस बाई बस’ हा पुन्हा एकदा नव्या एपिसोडसाठी सज्ज झाला आहे. यामध्ये राजकीय, फिल्म इंडस्ट्रीमधील, तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध महिला हजेरी लावतात. आता या कार्यक्रमाच्या अपकमिंग एपिसोडमध्ये अभिनेत्री पूजा सावंत हजेरी लावणार आहे.

या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून पूजाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता फडणवीसब्या राजकीय महिलांनी हजेरी लावली आहे.

आता अभिनेत्री पूजा सावंत या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. अभिनेत्री तिचा सिनेमा ‘दगडी चाळ २’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यादरम्यानच तिने ‘बस बाई बस’मध्ये हजेरी लावली आहे. यावेळी तिने पारंपरिक अंदाज कॅरी केला असून जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

यावेळी कार्यक्रमातील एका टास्कदरम्यान पूजाने तिचा क्रश कोण आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा असल्याचे सांगितले आहे.’ बस बाई बस’ मध्ये एक सेगमेंट असते ज्यात एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला जातो. ती व्यक्ती बसमधील सहप्रवासी असल्याप्रमाणे त्याच्याशी बातचीत करायची असते.

यावेळी ‘बस बाई बस’चा सूत्रसंचालक अभिनेत्रीला बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवतो. या फोटोशी संवाद साधण्याचं काम पूजाला करायचं असतं. यावेळी, सिद्धार्थशी बोलताना पूजा म्हणते की, ‘माझा तुझ्यावर खूप मोठा क्रश आहे. माझं जर तुझ्याशी लग्न झालं तर मला आवडेल.’

पूजा सावंतने असा संवाद साधताच ‘बस बाई बस’च्या सेटवर सुबोधसह सर्वच जण ओरडू लागतात. तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ‘दगडी चाळ २’ हा सिनेमा १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now