Share

कॅनडामध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा डंका; आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावत उंचावली भारताची मान

Sandeep Pathak

मराठमोळा अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याद्वारे तो त्याचे अनेक फोटो शेअर करण्यासोबतच त्याच्या दैनंदिन जीवनासंबंधितही अनेक गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतो. नुकतीच संदीपला एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे. यासंदर्भात संदीपने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

संदीपने कॅनडा येथील ‘काऊच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार मिळवत संदीपने मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यासंदर्भात त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत आपला आनंत व्यक्त केला आहे.

संदीपने चित्रपट महोत्सवाचा एक पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘आनंदाची बातमी – कॅनडा येथील Couch International Film Festival मध्ये मला BEST ACTOR चा पुरस्कार मिळाला होऽऽऽऽऽ @couchfilmfestival @raakhthefilm’. यासोबत संदीपने #RAAKH #sandeeppathak #actorsandeeppathak #instapost #instagood #instadaily #instagram #winnerbestactor #couchfilmfestival हे हॅशटॅगही वापरले आहेत.

संदीपची ही पोस्ट पाहताच चाहते त्याच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत त्याला शुभेच्छा देत आहेत. तर संदीपने अभिनय केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलं आहे. यासोबतच पॅरिस येथे झालेल्या एआरजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म चा पुरस्कार मिळाला आहे.

संदीप पाठक मुळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड असल्याने त्याने शाळेत आणि कॉलेजदरम्यान अनेक नाटकात काम केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यातील ललित कला केंद्र येथून अभिनय क्षेत्रात पदवी मिळवली. त्यानंतर २००० साली तो मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर त्याने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम केले.

संदीपने आतापर्यंत ‘असा मी असामी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘जादू तेरी नजर’, ‘ज्याचा शेवट गोड’, ‘सासू माझी धांसू’ अशा नाटकात काम केला आहे. तसेच ‘फू बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा मालिकेत तर ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘रंगा पतंगा’ यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
शाहरूखचा ‘पठाण’ चित्रपट लीक झाला? वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य
तु ज्या महिलांवर अत्याचार केलेत त्या एक दिवस.., सलमान खानला एक्स गर्लफ्रेंडने दिली धमकी
एप्रिलमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास ‘हे’ चित्रपट सज्ज; वाचा यादी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now