Share

‘शिवरायांची समाधी फुलेंनीच बांधली’; दिग्दर्शक हेमंत ढोमेंनी पोस्ट करत राज ठाकरेंना दाखवला आरसा

raj

1 मे रोजी झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी कोणी बांधली? यावरून सध्या आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. सभेत बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं.

यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी वादावर मराठी कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत. लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेने देखील ही यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. हेमंतने ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये हेमंतने म्हंटलं आहे की, “छत्रपती शिवरायांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर युगपुरुष” असं लिहिले आहे.

सध्या राजकीय वर्तुळात हेमंतचे हे ट्विट चर्चेचा विषय बनला आहे. याचबरोबर हेमंतने एक फोटोदेखील शेअर केला आहे. सोबतच “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले” असे कॅप्शन त्याने दिले आहे. यामुळे सध्या हेमंतचे हे ट्विट वाऱ्यागत व्हायरल झाले असून सर्वत्र ट्विटची चर्चा सुरू आहे.

तसेच या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि ४ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. या सर्व प्रकरणावर अनेक कलाकारांनीही आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली आहे. त्यामध्ये मराठी अभिनेत्री-अभिनेत्यांचाही समावेश आहे. नुकतंच प्राजक्ता माळीनं एक वक्तव्य केलं आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ताने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अक्षय तृतीय्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शुभेच्छा देताना राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने पारंपारिक वेशभुषा केलेली दिसत आहे. यासोबतच वर्तमानपत्रात आलेल्या एका लेखाचा फोटोही तिने शेअर केला आहे.

या लेखात मशिंदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. ही पोस्ट शेअर करत ती म्हणाली की, मा श्री राज ठाकरे सगळ्याचसाठी..परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या-महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचे तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानाने भरून आला, अंगावर स्फुरण चढलं. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खुप खुप धन्यवाद, असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now