शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. ‘खासदार होवो अगर न होवो.. माझी यापुढील वाटचाल स्वराज्य संघटनेचे काम करतच सुरु राहील. गेली दहा वर्षे समाजासाठी मी जे काम करत आहे त्याची दखल घेऊन सर्व पक्षांनी मला पाठबळ द्यावे ही,’ अशी इच्छा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवली होती.
मात्र तरीदेखील शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील औपचारीक घोषणा करण्याचे बाकी आहे. तर आता संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्च्याच्या करण गायकर यांनी थेट शिवसेनेला गर्भित इशारा दिला आहे. ‘निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवून देऊ,’ असं त्यांनी म्हंटलं आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मराठा समाज, बहुजनांचे मतदान हवे असेल तर आज छत्रपतीना बिनविरोध राज्यसभेत पाठवा, अन्यथा पक्षाचा प्रोटोकॉल पाळायचा असेल. तर येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील लोक प्रतिनिधींना मराठा समाज त्यांची जागा नक्की दाखवेल,’ असा थेट इशारा गायकर यांनी दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘संभाजीराजेंना विजयासाठी लागणाऱ्या 42 मतांची जलावजुळव झाली आहे. 5 ते 6 मतांची कमी असल्याने जुळवाजुळव चालू असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘थेट कोणत्याच पक्षात मी प्रवेश करणार नाही,’ अशी ठाम माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांनी घेतली आहे. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवणार असल्याचे संभाजीराजे यांनी निश्चित केले आहे. ते म्हणाले, ‘मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही,’ असे संभाजीराजे स्पष्टच बोलले.
महत्वाच्या बातम्या :-
मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली
जेव्हा मिमिक्रीमुळे वादात सापडली होती सुगंधा मिश्रा, कंगनाने दिली होती थेट ‘ही’ धमकी, वाचा किस्सा
पाकिस्तानी गायकाने करण जोहरवर लावला गाणं चोरल्याचा आरोप, T-series ने दिले चोख प्रत्यु्त्तर, म्हणाले..