मराठा क्रांती मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंना हिसका दाखवलाच! पुण्यात पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड राडा

सध्या वकील गुणरत्न सदावर्ते वेगवेगळ्या अडचणींच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज सदावर्ते चौकशीसाठी पुण्यात आले असताना त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संपुघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. यावेळी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर चांगलाच राडाही घातला आहे.

आज सलग दुसऱ्या दिवशी एका गुन्ह्यासंदर्भातील चौकशीसाठी सदावर्ते पुण्यात आले होते. मात्र सदावर्ते पोलीस ठाण्यात दाखल होताच मराठा समाजाने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मध्यंतरी सदावर्ते यांना एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

परंतु या प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने जामीन दिला आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या मनात सदावर्ते यांच्याविषयी राग भरलेला आहे. त्यामुळे सदावर्ते चौकशीसाठी पुण्यात येतात त्यांच्याविरोधातील मराठा क्रांती मोर्चा संघटनेने आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान एका मुलाखतीत बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवरायांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होत. त्यामुळे त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना काल आणि आज पोलिसांनी ठाण्यात बोलावले होते.

यावेळी त्यांची पोलिसांनी दोन तास चौकशी केली. यानंतर ठाण्यातून बाहेर पडताच सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सदावर्ते यांचा निषेध नोंदविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीरसह इतर कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर आले होते. यातील काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या
तुरुंगातून बाहेर आलेल्या रवी राणांना पाहून नवनीत राणा हमसून हमसून रडू लागल्या, पहा व्हिडिओ
“मशिदींवरचे भोंगे बंद करतो, पण साईबाबांची काकड आरती भोंग्यावरच होऊ द्या”
मनसेत फाटाफूट! संजय राऊतांच्या उपस्थितीत पुण्यातील मनसेचा ‘हा’ बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश
ज्युनियर NTR च्या पत्नीने लग्नात नेसली होती १ कोटींची साडी; लग्नाच्या खर्चाचा आकडा पाहून फुटेल घाम