आज गुडीपाडव्याच्या निमित्ताने वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना, “सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचे वातावरण तयार केलं जातय.” असे उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधत म्हणले.
या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे “एक वातावरण तयार केलं जातय, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केलं, त्याचं नावच महाविकास आघाडी असं ठेवलं आहे. महाविकास हे केवळ आपल्या नावामध्ये नाही तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो आहोत.” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यानंतर, “आपण आपल्या राजकीय आयुष्यात पाहीलेलं आहे, अनेकदा घोषणा होतात, नारळवाल्यांचा खप जोरदार होतो, कारण अनेकवेळेला अनेकजण नारळ फोडतात आणि मग त्या कोनशीला तशाच असतात. कारण नंतर त्या शीलेला कोणी विचारतच नाही, म्हणून तिला कोनशीला म्हणतात की काय मला कल्पना नाही. परंतु तसं नाही आजचं भूमीपूजन हे केवळ नारळ फोडण्यासाठी नाही.” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
इतकेच नव्हे तर, “आपल्यावरती रुसवा, फुगवा किंवा आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या ते उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही, कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या ते मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून दिलेलं हे चोख उत्तर आहे.” अशी टीका ठाकरेंनी यावेळी केली आहे.
पुढे बोलताना, “मनातील संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत अर्थबळ लागते. वस्तू आणि सेवा कर राज्य अर्थव्यवस्थेचा पाठकणा असून तो मजबूत झालाच पाहिजे. या कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाच राज्य आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी सर्व अधिकारी -कर्मचारी आणि अजित दादांना लाख लाख धन्यवाद.” अशा शब्दात त्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान “जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवार यांना आहे. त्यांनी आणि या सरकारने प्रत्यक्ष या इमारतीच्या जागेसाठी पाठपुरावा केला, अनेक परवानग्या मिळवल्या. मागील दोन वर्षे आपण प्रत्यक्ष कामात दिसलो नव्हतो पण त्यापाठीमागे आपण अनेक विकास कामांचे नियोजन केलं. त्यातूनच आजच्या पर्यावरणपूरक नवीन वास्तूचे भूमिपूजन होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम आहे.” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
KKR Vs PBKS च्या मॅचमध्ये रसेलने मारले ८ सिक्सर पण चर्चा मात्र सुहाना खानचीच; व्हायरल झाले बोल्ड फोटो
पंतप्रधान पद हातातून जाताना पाहून इम्रान खान यांना आली बरखा दत्तची आठवण, केला ‘हा’ गंभीर आरोप
CRPF च्या बंकरवर बॉम्ब टाकणाऱ्या महिलेला अटक, याआधीही तिच्यावर अनेक गुन्हे झालेत दाखल
“मला शक्य तितक्या लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचंय, मी त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करेन”