Share

राज्यसभा निवडणुकीत राणा दाम्पत्य ‘अशी’ करणार शिवसेनेची गोची; राजकीय समीकरण बदलणार

udhav thackeray

आता खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी (काल) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. या निवडणुकीत नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप – शिवसेना या दोन्ही पक्षांमधला संघर्ष अधिक वाढला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाने चांगलीचं कंबर कसली आहे. अशातच अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य सातत्याने शिवसेनेला धारेवर धरत आहेत. नवनीत राणा यांनी तर थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील आव्हान दिलं होतं. असे असतानाच आता आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे.

रवी राणा याबद्दल माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. अपक्ष आमदारांनी सर्व पत्ते पिसून ठेवले असून ते फक्त टाकणं बाकी आहे, असं म्हणत रवी राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं आहे.

रवी राणा यांच्या विधानाने आता खळबळ उडाली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल. मतदानाच्या वेळेस अपक्षांच्या माध्यमातून मोठा भूकंप ठाकरे सरकारला दिसेल असा खळबळजनक गौप्यस्फोट देखील रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता १५ तर भाजपला २० मतांची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आव्हाड संतापले! म्हणाले, अक्षय कुमार हा मूर्ख माणूस, पुरंदरेंवरही केले ‘हे’ गंभीर आरोप
बृजभूषण यांना कोणी मॅनेज करु शकतं हे डोक्यातून काढून टाका; शरद पवारांचा मनसेला टोला
भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली; संजय राऊत स्पष्टच बोलले
‘रात्री १२ वाजता शहांना फोन करून म्हणालो दिल्लीतच बसलोय, अटक करा पण झुकूंगा नही साला’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now