मांत्रिकाकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण अलीकडे वाढताना पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आलं आहे. मांत्रिकाने गतिमंद तरुणीवर बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा आणखी कसून तपास करत आहेत.
वाचा नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. २१ वर्षीय पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. तिची आई तिच्या मुलीची बुद्धी तल्लख करण्यासाठी तांत्रिकाकडे घेऊन गेली होती. यावेळी ही धक्कायाक घटना घडली.
आरोपीने आईला काहीतरी बहाणा करून खोलीबाहेर नेले आणि मुलीवर बलात्कार केला. मुलगी चांगली व्हावी यासाठी तिची आई तिला मांत्रिकाकडे घेऊन गेली होती. तिथे नेल्यानंतर मांत्रिकाने आईला खोलीबाहेर जायला सांगून तरुणीवर बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेकडून दाखल करण्यात आली आहे.
तसेच पोलिसांनी तात्काळ या तक्रारीवरून आरोपी मांत्रिकाला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं गेलं आणि त्यानंतर मांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर ती बरी होईल, असंही मांत्रिकाने तिला सांगितलं होतं.
दरम्यान, मात्र घडलं वेगळच.. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर तिच्या आईन तत्काळ पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.