‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शनापासून फारच चर्चेत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याचे खूप कौतुक करत आहेत. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीजसुद्धा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत चित्रपटाचे, त्यामधील कलाकारांचे आणि दिग्दर्शकांचे कौतुक करत आहेत. यारदरम्यान बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) यांनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज मुंतशिर यांनी यांच्या मते ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहून त्यावर व्यक्त न होणं हे खूपच चुकीचं ठरेल. त्यामुळे त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ संदर्भात प्रतिक्रिया देत एक ट्विट केला. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘दुसऱ्यांचे चित्रपट तर सोडाच पण मी माझे चित्रपट प्रमोट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतो. पण ‘द कश्मीर फाईल्स’वर गप्प बसणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मी बोलत आहे’.
मनोज यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते सांगत आहेत की, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने एका मोठ्या वर्गाला भावूक केले आहे. ९० च्या दशकात काश्मीरमधील दीड लाख काश्मिरी पंडितांना पलयान करावे लागले होते. त्यावेळी दिल्लीतील सरकार झोपा काढत होतं. या विषयावर यापूर्वीही एक चित्रपट आला होता. पण या त्रासातून जे लोक गेले त्यांना हा चित्रपट पाहून संताप अनावर झाला होता. चित्रपट पाहून लोक म्हणाले की, हे काय आहे? तुम्ही तर सर्व सॅनिटाईज करून टाकलात’.
https://twitter.com/manojmuntashir/status/1503210773576753157?s=20&t=O3UUT8fE6eHyRN6DW2yH2g
मनोज यांनी पुढे म्हटले की, ‘त्रासदायक इतिहास स्वीकारल्याशिवाय मैत्री होऊ शकत नाही. आमच्या आणि तुमच्यामध्ये जो काही इतिहास आहे, समस्या आहेत त्यावर भाष्य केल्याशिवाय आप पुढे जाऊ शकत नाही. पण तुम्हाला जर या विषयावर बोलायचे नसल्यास तर त्यावर माती घालून गोष्टी झाकून ठेवता येत नाहीत’.
यावेळी विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक करताना मनोज यांनी म्हटले की, ‘ही कथा दाखवल्याबद्दल विवेक रंजन अग्निहोत्री यांना प्रणाम. पण ही गोष्ट दाखवण्याचा परिणाम ते भोगत आहेत. ते माझे मित्र आहेत त्यामुळे मला माहित आहे. त्यांनी हा चित्रपट नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तयार केला नाही. तर चित्रपटाद्वारे एक कथा सांगण्यासाठी त्यांनी तो तयार केला आहे. याचा परिणाम त्यांना पुढे कोणत्या ना कोणत्या रूपात इंडस्ट्रीमध्ये भोगावे लागणार’.
मनोज यांनी पुढे म्हटले की, ‘पण ते धाडसी आहेत. त्यामुळेच ते अशाप्रकारचे चित्रपट काढत आहेत. येत्या काळातही ते यासारखे अनेक चित्रपट काढतील. या गोष्टी सांगण्यास आम्ही घाबरत होतो. पण आता आम्ही अभिमानानं यावर बोलत आहोत’. दरम्यान विवेक अग्निहोत्री द्वारा दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास ‘द काश्मीर फाईल्स’ सज्ज; वाचा संपूर्ण डिटेल्स
तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये गेले असते; ‘आई कुठे काय करते?’ फेम अश्विनी महांगडेचा खुलासा
Top 5 South Gossips of the Day: २ दिवसात राधे श्यामचा तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला, RRR चे महत्वाचे सीन्स लीक