जेव्हापासून दाक्षिणात्य चित्रपट (South Indian Movies) पॅन इंडिया चित्रपट म्हणून प्रदर्शित होत आहेत तेव्हापासूनच सिनेसृष्टीचे चित्र बदलल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे भारतीय चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपट असा वादही सुरु झाल्याचे दिसून येत आहे. एकामागून एक सुपरहिट होत आणि बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा बनले आहेत.
लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आलेल्या ‘आरआरआर’ चित्रपटानेही रेकॉर्डतोड कमाई केली होती. तर आता ‘केजीएफ २’ हा चित्रपटही अनेक रेकॉर्ड तोडत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यादरम्यान दाक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेले यश पाहून नुकतीच बॉलिवड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने यावर प्रश्न उपस्थित केले होते.
नवाजने म्हटले होते की, ‘असे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करत असतात. यामध्ये विमान पाण्यावर चालतो आणि मासे हवेत उडतात. हा सर्व व्हिज्युअल अनुभव असतो. पण यामध्ये चित्रपट कुठे आहे?’ तर दुसरीकडे मात्र, दाक्षिणात्य चित्रपटांच्या या यशामुळे अभिनेता मनोज वाजपेयी खूश आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटांच्या बाबतीत हिंदी चित्रपट कुठे कमी पडत आहेत, याबाबत त्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे.
मनोज वाजपेयीने नुकतीच ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दाक्षिणात्य चित्रपट आणि त्यांचे यश याबाबत आपले मत मांडले. त्याने म्हटले की, ‘दाक्षिणात्य चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होत आहेत. मनोज वाजपेयी आणि माझ्यासारख्या लोकांना तर सोडाच, या चित्रपटांच्या यशाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. कोणाला समजत नाहिये की, काय करावं, कुठे पाहावं’.
यावेळी दाक्षिणात्य कलाकार आणि दिग्दर्शकांबाबत बोलताना मनोजने म्हटले की, ‘ते त्यांच्या कामाबाबत खूप पॅशनेट आहेत. ते चित्रपटाचा प्रत्येक शॉट अशाप्रकारे घेतात की, ते जगातील सर्वात बेस्ट शॉट आहे. यासाठी आवड आणि खूप विचार लागतो. ते एकदासुद्धा प्रेक्षकांबद्दल अपमानास्पद पद्धतीने बोलत नाहीत. प्रेक्षक समजून घेतात. चालून जातं, अशी भाषा ते अजिबात वापरत नाहीत. ते त्यांच्या प्रेक्षकांचा खूप आदर करतात. त्यामुळे त्यांची ही पद्धतच त्यांचे चित्रपट हिट करतात’.
पुढे मनोज यांनी ‘पुष्पा’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटांचे उदाहरण देत बॉलिवूड कोणत्या गोष्टीत मागे पडत आहे, याबाबत सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, ‘जर तुम्ही ‘पुष्पा’ आणि ‘केजीएफ २’ चित्रपटाचे मेकिंग पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की, ते पूर्णपणे वेगळे आहे. प्रत्येक सीन आणि फ्रेम या पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे की, ते त्यांच्यासाठी जीवन-मृत्यूचा संघर्ष आहे. आणि आपल्यात त्याचीच कमी आहे’.
‘आपण मेनस्ट्रीम चित्रपटांबाबत केवळ पैसा आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई या अनुषंगाने विचार करतो. आपण स्वतःला दोष देऊ शकत नाही ना. त्यामुळे आपण त्यांना भिन्न म्हणत वेगळे करतो. परंतु, यातून चित्रपट कसा तयार करावा हे बॉलिवूड इंडस्ट्रीने शिकायला हवं’, असेही मनोज वाजपेयी यांनी यावेळी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या :
तुमची लाडकी ‘अप्सरा’ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; दिवस आणि ठिकाण देखील ठरलं!
विवेक ऑबेरॉय: वडिलांच्या चित्रपटात काम करण्यास नकार देणारा एकमेव अभिनेता, यशराजशीही घेतला पंगा
अजय देवगनने ‘या’ कारणामुळे काजोलशी केले आहे लग्न, नवीन जोडप्यांनी घेतला पाहिजे दोघांचा आदर्श