झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Mann Udu Udu Zhala) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दीपूच्या जोडीला चाहते खूप पसंती देत असतात. यादरम्यान मालिकेत इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. अजिंक्यबाबत एक पोस्ट सध्या व्हायरल होत असून यामध्ये तो लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी सिरिअल्स ऑफिशियल नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर अजिंक्यबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली. यामध्ये सांगण्यात आले की, ‘अजिंक्य राऊत ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. आता अजिंक्य लवकरच आपल्या भेटीला एक नव्या चित्रपटातूनही येतोय. मालिकेनंतर अजिंक्य आता मराठी चित्रपटात झळकण्यास सज्ज झालाय!!’
अजिंक्यबाबतची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते फारच खुश झाले आहेत. तसेच ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. परंतु, असे असले तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच अजिंक्यनेही यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
शिवाय हा चित्रपट कोणता असणार? कथानक काय असणार? अजिंक्य कोणती भूमिका साकारणार? इतर कलाकार कोण? यासंदर्भातही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे व्हायरल होणारी ही पोस्ट खरं आहे की खोटं, हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र, या बातमीने अजिंक्यचे चाहते मात्र फारच खूश आहेत.
दरम्यान, अजिंक्य राऊत हा मूळचा परभणीचा आहे. त्याने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंग करत असतानाच त्याला एका मोठ्या भूमिकेची ऑफर मिळाली. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठू माऊली’ या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तो विठू माऊलींच्या भूमिकेत दिसला. या भूमिकेद्वारे त्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.
सध्या अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो अभिनेत्री ह्रता दुर्गुळेसोबत दिसत आहे. मालिकेत अंजिक्य इंद्रा तर ह्रता दीपू ही भूमिका साकारत आहे. मालिकेत दीपू ही शांत, सुशिक्षित आणि शिस्तबद्ध शिक्षकाची मुलगी आहे. तर इंद्रा टपोरी, डॅशिंग आणि तितकाच प्रेमळ असा मुलगा आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीला चाहत्यांचीही खूप पसंती मिळत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
महेश भट फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना ड्रग्ज व पोरी पुरवतात; सुनेच्या गंभीर आरोपांनी उडाली होती खळबळ
महेश भट्ट यांनी मुलगी पुजाबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ लज्जास्पद इच्छा, लिपलाॅक किस देखील केला होता
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले