Share

‘गळाभेट घेत-बिर्याणी खायला गेल्याने…,’ मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

narendra modi

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते मनमोहन सिंग (manmohan singh) यांनी जनतेसाठी गुरुवारी एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. साधारण ९ मिनीटांच्या या व्हिडिओत मनमोहन सिंह यांनी त्यांच्या संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (manmohan singh criticize on pm narendra modi)

भाजप सरकारचे धोरण व वर्तन दोन्ही चुकीचे आहे. त्यांच्या धोरणात स्वार्थ आहे आणि वर्तनात द्वेष व दुही आहे. भाजपच्या स्वार्थासाठी देशाला जात-धर्म आणि प्रदेशाच्या नावाखाली विभागले जात आहे, लोकांना आपसात लढण्यास भाग पाडले जात आहे. या सरकारचा बनावट राष्ट्रवाद जेवढा पोकळ आहे, तेवढाच घातकही आहे, असा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला.

तसेच भाजपाचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या फो़डा आणि राज्य करा या धोरणावर आधारीत आहे. या सरकारच्या काळात घटनात्मक संस्था दुर्बल केला जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. मला ‘मौनमोहन’ म्हणून हिणवणाऱ्या भाजपचे खरे रूप देशासमोर आले आहे याचे मला समाधान वाटते, असेही ते म्हणाले.

पुढे व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ‘सरकारनं ही गोष्टही लक्षात घ्यावी की केवळ वरवरचा दिखाऊपणा करण्यानं परिस्थिती बदलत नाही. सत्य कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रुपात दिसून येतच. परदेशी नेत्यांना जबरदस्ती मिठी मारण्यानं किंवा न बोलवता बिर्याणी खायला जाण्यानं संबंध सुधारत नाहीत, असा टोला देखील त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणतात, ‘करोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी विस्कटली, बेरोजगारी वाढली आणि महागाईत वाढ झाली, यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. गेली साडेसात वर्षे सरकार चालवल्यावर स्वतःच्या चुका कबुल करायला हे सरकार तयार नाहीये.’

दरम्यान, “पंतप्रधानपदाची विशेष अशी प्रतिष्ठा असते आणि होऊन गेलेल्या गोष्टींवर दोषाचे खापर फोडून आपले गुन्हे लपवता येत नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. मी पंतप्रधान म्हणून दहा वर्षे काम केले. स्वत: बोलण्याऐवजी मी काम करण्याला प्राधान्य दिले,” असे या व्हिडिओमधून मनमोहन सिंग यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीने पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य, उचललं टोकाचं पाऊल
किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; संजय राऊतांची खोचक टीका
साजिद नाडियावाला आणि दिव्या भारतीच्या लव्हस्टोरीमध्ये गोविंदाचा होता महत्वाचा रोल, वाचा किस्सा
PHOTO: बाथटबमध्ये लहान मुलासारखे झोपलेले दिसले अनुपम खेर, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सचा पडला पाऊस

इतर आर्थिक राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now