crime news : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे, दिवाळी..! दिवाळी म्हणजे दिवे, फराळ, फटाक्यांचा उत्साह..! दरवर्षी फटक्यांमुळे अनेक प्रकार घडतात. लहान – लहान मूलं फटाक्यांशी मस्ती करताना जखमी होतं असल्याच्या अनेक घटना घडतं असतात. आतापर्यंत फटाक्यांच्या नादात अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहेत.
यामुळे फटाके फोडत असताना पालकांनी मुलांवर लक्ष्य ठेवावे, असं आवाहन करण्यात येतं. मात्र असं असलं तरी देखील, दरवर्षी अनेक घटना घडतं असल्याच आपण पाहतो. हे सांगण्याच कारण म्हणजे, फटाक्याने एका तरुणीचा जीव गेला आहे. दिवाळीत कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे. अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण दिवाळीच्या सणात सहभागी होत असतात. मात्र आनंदाच्या भरात अशा काही घटना घडतात की सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. नुकताच असाच एक विचित्र प्रकार घडला असल्याच समोर आलं आहे.
ही घटना मध्य प्रदेशमधील मंदसौरच्या भावगढतील कारजू गावात घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धनलाल हे एक शेतकरी आहेत. त्यांच्या घरात दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजा होती. मोठ्या आनंदात कुटुंबियातील सर्वांनी पूजा केली. घरात आनंदाचे वातावरण होते.
अशातच एक अशी घटना घडली की, कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला. गोवर्धन पुजेनंतर गोवर्धनलाल यांची मुलगी टीना लहान भावासह फटाके फोडत होती. भाऊ स्टिलच्या टिफिनमध्ये सुतळी बॉम्ब ठेऊन फोडू लागला. टीना त्याचा व्हिडीओ शूट करत होती.
पुढे घडलं असं काही की, वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. भावाने लावलेला बॉम्ब फुटताच स्टिलच्या डब्याचा टोकेदार तुकडा टीनाच्या पोटात घुसला. कुटुंबीयांनी तात्काळ टीना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषत केले. या घटनेने कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला.
महत्वाच्या बातम्या
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर