Share

मंदानाने उघड केले मोठे रहस्य, म्हणाली, ‘माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते’

Lock Upp

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा ‘लॉकअप’ (Lock Upp) हा शो सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सेलिब्रिटी अनेक धक्कादायक खुलासे करत असतात. यादरम्यान आता शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे परत आलेली स्पर्धक मंदाना करिमीने तिच्या पतीबाबत मोठा खुलासा केला आहे. यामुळे ती सध्या माध्यमात चर्चेत आहे.

लॉकअप शोदरम्यान अजमा फल्लाह मंदानाला तिच्या बॉयफ्रेंडबाबत विचारते. तेव्हा मंदाना म्हणते की, ‘नो कमेंट्स’. त्यानंतर अजमा स्वतःबद्दल सांगताना म्हणते की, ती सध्या २३ वर्षांची आहे आणि जेव्हा ती २६-२७ वर्षांची होणार तेव्हा लग्न करणार. अजमाचे हे बोलणे ऐकून मंदना म्हणते की, तिनेसुद्धा वयाच्या २७ व्या वर्षी लग्न केले होते.

मंदानाने तिचा माजी पती गौरव गुप्तासोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत सांगताना म्हटले की, ‘आम्ही जवळपास अडीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा केला होता. साखरपुडा झाल्याच्या ७-८ महिन्यानंतर लगेचच आम्ही लग्न केला. त्यानंतर जवळपास आम्ही ८ महिने एकमेकांसोबत होतो. परंतु, त्यानंतर आमच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली’.

https://www.instagram.com/p/CbxnMQxgMa4/

मंदानाने पुढे सांगितले की, ‘आम्ही ४ वर्षापर्यंत वेगळे राहिलो आणि काही महिन्यांपूर्वीच २०२१ मध्ये आम्ही घटस्फोट घेतला. आता तो माझ्याशी असे वागतो की जसे तो मला ओळखतच नाही. आम्ही वेगळे झाल्यानंतर माझ्या पतीने त्या सर्व महिलांसोबत संबंध ठेवले ज्यांनी मी चांगल्याप्रकारे ओळखते’.

मंदानाचे हे बोलणे ऐकून अजमा म्हणते की, ‘हे तुला आधीच माहित होतं तर तू त्याच वेळी घटस्फोट का घेतला नाहीस?’ त्यावर मंदाना म्हणते की, ‘हे माझ्या आयुष्यातील मोठे गुपित आहे जे केवळ मलाच माहित होतं’. दरम्यान मंदानाने ५ वर्षापूर्वी तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा खटलासुद्धा दाखल केला होता.

मंदानाने यावेळी तिच्या सासरच्या मंडळींबाबत बोलताना सांगितले की, ‘लग्नापूर्वी मला गौरवचे कुटुंबीय खूप पाठिंबा देत असत. पण लग्नानंतर सर्वकाही बदलले. मला फक्त सलवार कमीज घालण्यास, मंदिराच्या बाहेर बसण्यास सांगत असत. तसेच मला एकटीला कुठे बाहेरही जायला देत नसत’. दरम्यान मंदिराने ‘क्या कूल है हम’, ‘मैं और चार्ल्स’, ‘भाग जॉनी’, ‘रॉय’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक
टीआरपीच्या शर्यतीत ‘ही’ मालिका ठरली नंबर १; टॉप १० मध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांनी मारली बाजी
‘या’ अभिनेत्यामुळे ऐश्वर्या-आभिषेकमध्ये पडली प्रेमाची ठिणगी, स्वत: आभिषेकने सांगितला मजेदार किस्सा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now