बॉलिवूड स्टार अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज'(Prithviraj) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्यात दिल्लीचा शेवटचा हिंदू सम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनाची आणि शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे.(manav-vij-had-reached-mumbai-to-become-an-actor-after-leaving-his-doctorate-mohammad-ghori-i)
पृथ्वीराज चौहानच्या काळात मोहम्मद घोरीने(Mohammed Ghori) भारतावर हल्ला केला होता. या युद्धात पृथ्वीराज चौहानचा पराभव झाला आणि नंतर घोरीने त्याची हत्या केली. तथापि, भारतीय पौराणिक कथांनुसार, मृत्यूपूर्वी आंधळा झालेल्या पृथ्वीराजने मोहम्मद घोरीचा वध केला होता.
चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती मिळत असतानाच, मोहम्मद घोरी या व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानव विजने घोरीचे हे खतरनाक दिसणारे पात्र साकारले आहे. चला, जाणून घ्या कोण आहे मानव विज(Manav Vij) ज्याने या नकारात्मक पात्रात जीव ओतला आहे.
‘मानव विज’चा जन्म पंजाबमधील फिरोजपूर येथे 1977 मध्ये झाला. मजबूत उंचीच्या मानव विजचे शिक्षण पंजाबमध्येच झाले होते. अभ्यासात हुशार असलेला मानव विज हा व्यवसायाने डॉक्टर आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यानी लुधियाना मेडिकल कॉलेजमधून होमिओपॅथीची पदवी घेतली आहे.
मानवने अभिनयात येण्यापूर्वी बराच काळ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली आहे. मात्र, कालांतराने तो अभिनयाकडे वळला आणि डॉक्टरी पेशाला अलविदा म्हणाला. मानव विजने 2009 साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री मेहर विजसोबत लग्न केले.
सोनू सूदच्या(Sonu Sood) मुख्य भूमिकेतील डेब्यू चित्रपट ‘शहीद-ए-आझम’ मध्ये क्रांतिकारक सुखदेव थापरची भूमिका साकारल्यानंतर मानव विजला मोठा ब्रेक मिळाला. हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने मानव विजलाही ओळख दिली. यानंतर मानवला पंजाबी चित्रपटांमध्ये खूप भूमिका मिळू लागल्या.
मानवने पंजाबीशिवाय तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर एकता कपूरच्या सुपरहिट सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मध्ये जॉयदीप साहिल विराणीची भूमिका साकारल्यानंतर मानव घरोघरी ओळखला जाऊ लागला. या मालिकेशिवाय मानवने ‘किस देश में है मेरा चांद’, ‘मितवा फूल कमल के’ आणि ‘परछाई’मध्येही काम केले आहे.
बॉलीवूडबद्दल बोलायचे तर, शहीद-ए-आझमनंतर मानवने उडता पंजाब, रंगून, फिल्लौरी, नाम शबाना, लखनौ सेंट्रल, इंदू सरकार, रेस 3, अंधाधुन, भारत, लाल कप्तान, गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल आणि रूही यांसारखे चित्रपट केले आहेत.
आता त्याचा ‘पृथ्वीराज‘ हा चित्रपट 3 जून 2022 रोजी प्रदर्शित होत आहे. अक्षय आणि मानव यांच्याशिवाय या चित्रपटात सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटापूर्वी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.