Share

पार्थ पवारांचं नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यावर टाकला दबाव, फोन करून म्हणाला, मी आणि पार्थ पवार..

partha pawar

महाराष्ट्राच्याच नाही तर राष्ट्रीय राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ओळखले जातात. अनेकदा आपल्या राजकीय भुमिकांसाठी तसेच मतांसाठी ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता पवारांचे नातू पार्थ पवार हे चर्चेत आले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करुन हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर खोटी साक्ष आणि तपास चुकीच्या पद्धतीने करावा यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? पार्थ पवारांच्या नावाचा कोणी केला चुकीचा वापर?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नावे पोलीस अधिकाऱ्यालाच एकाने धमकावल्याचं समोर आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला धमकावत चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी दबाव टाकल्याच प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हा प्रकार सोमवारी घडला. पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा यासाठी दबाव टाकल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात अमित देवराम कलाटे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामने हे करत आहेत. त्यांना रजेवर असताना अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता.

“तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय आहे ना? तुमच्या त्यात काय स्टॅण्ड आहे? मी पार्थ पवार यांचा मित्र आहे. मी अमित कलाटे, पार्थ पवार आणि यांचा पीए सागर जगताप खास मित्र आहोत. तुम्हाला जे सांगतोय ते ऐका, वाटल्यास समोरासमोर भेटतो. अमितचा विषय मिटवून घ्या, अन्यथा हे प्रकरणवर पर्यंत जाईल,” असे म्हणत धमकावल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: ‘या’ हिंदू अभिनेत्रीने तब्बल चार वेळा केलंय मुस्लिम दिग्दर्शकाशी लग्न, कारण वाचून अवाक व्हाल
बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीन सिद्दीकी संतापला, म्हणाला, एखादी सावळी अभिनेत्री सांगा जी..
अभिनेत्री, डान्सर, निवेदिका ते कवयित्री…. जाणून घ्या प्राजक्ता माळीच्या प्रवासाबाबत
कौतुकास्पद! दीपिका पादुकोणने विदेशात वाढवला भारताचा मान; मिळवला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now