अनेकदा अवैध संबंधातून धक्कादायक घडणा घडल्याचे उघडकीस येते. अवैध संबंधातून अनेकदा कुटुंब विभागत, नातं तुटत.. अनेकदा तर यातून काहीही जण टोकाच पाऊल उचलून जीवन संपवतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहोत ती वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल.
एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिलं आणि यानंतर दोघांना झाडाला बांधून ठेवलं. ही घटना मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील सुठालिया ठाण्याच्या क्षेत्रातील खनोटा गावातील जंगलात घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शुक्रवारी घडला आहे. खनोटा गावातील एका शेतात महिला आणि तिच्या प्रियकराला बांधून ठेवल्याची तक्रार मिळाली होती. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा तिथे पाहिलं की एक महिला आणि एका पुरुषाला दोरीने बांधलं गेलं आहे.
त्याच झालं असं, पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिलं आणि त्याला राग आला. यानंतर पती दोघांना पकडून जंगलात घेऊन गेला. त्यानंतर त्याने दोघांना झाडाला बांधून मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर नरी गावातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे, तर महिला खनोटा गावातील आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पती आणि पत्नी दोघांना समजवण्यात आलं आहे आणि दोघंही आपल्या घरी गेले आहेत. मात्र या घटनेने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. हा सर्व ड्रामा तेथील गावकरी मंडळी पाहत होती.
तर दुसरीकडे अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधातून एका तरुणानं प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपली बायको आणि मित्राच्या मदतीनं आधी प्रेयसीचा गळा आवळला त्यानंतर तिचं शीर धडावेगळं केलं. ही घटना लखनऊमध्ये घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हे त्या पुतीनला दाखवा, तिचे डोळे बघा; गोळीबारात ६ वर्षाच्या चिमुकलीची भयानक अवस्था, डॉक्टरही रडले
लग्न काही दिवसांवर आलेले असताना दोघेही गेले हॉटेलमध्ये, पुढे जे घडलं ते पाहून पोलिसही चक्रावले
PHOTO: ‘नमस्ते मेरा नाम है मोनिका’, झुंडमधील रिंकूचा लूक पाहून चाहत्यांच्या मनाचा सुटला ताबा
मोदीजी, एवढय़ा दिवस तुम्ही कुठे होता? युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यीनींचा मोदींना सवाल