Share

VIDIO : मर्सिडीजमधून आलेली एक व्यक्ती थेट रेशन दुकानात गेली; पुढे झालं असं काही की पाहून तुमची झोप उडेल

panjab

राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी पुरविल्या जातात. मोठ्या प्रमाणात गरीब आणि गरजूंना अत्यंत नाममात्र किंमतीत जीवनावश्यक अन्नधान्य पुरवतात. याशिवाय लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र रेशन कार्डही दिली जातात.

याचबरोबर प्रत्येक रेशनवर मिळणाऱ्या धान्याची रक्कमही ठरलेली असते. असं असलं तरी, आता एक असा व्हिडिओ व्हायरल होतं आहे की, तो पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मर्सिडीजमधून आलेल्या व्यक्तीने रेशनवर मिळणारे धान्य खरेदी केलं आहे.

https://twitter.com/ajaychauhan41/status/1567084572789325827?t=keLXGiz5wj2F4ulDhUd9cg&s=19
वाचा नेमकं व्हिडिओमध्ये काय?

सोशल मिडियावर व्हायरल होतं असलेला व्हिडिओ पंजाबच्या होशियारपूरमधील असल्याचं उघडकीस आलं आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आहे की, एका रेशन दुकानासमोर एक आलिशान गाडी येऊन उभी राहिली आणि मर्सिडीजमधून आलेली एक व्यक्ती रेशन दुकानात गेली.

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडिओनंतर अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. एवढ्या आलिशान गाडीतून आलेल्या व्यक्तीला रेशनचे धान्य कसे मिळाले? या व्यक्तीकडे रेशन कार्ड कसे आले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असतानाच व्हिडिओमागील सत्यता समोर आली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मर्सिडीजमधून धान्य देणाऱ्या व्यक्तीचं नाव सुमित सैनी आहे. त्यांना याबद्दल विचारलं असता, व्हिडीओमध्ये दिसणारी कार आपल्या नातेवाईकांची आहे.माझ्याच त्यांची कार घराजवळ असते. कार डिझेलवर चालणारी असल्यानं कधीतरी मी चालवतो, असं त्या व्यक्तीने सांगितलं.

सध्या दोन रुपये किलोने गहू घेऊन जाण्यासाठी मर्सिडीजमधून आलेल्या व्यक्तीची तुफान चर्चा रंगली आहे. व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतं आहे. या प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
Supreme Court : शिंदेगटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ठाकरे गटाला मोठा दिलासा; पहा काय घडलं कोर्टात…
Girish Bapat : …म्हणून मी पक्षावर नाराज आहे; पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्याने जाहीरच सांगीतले

आर्थिक इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now