प्रेमासाठी कायपण..! असं देखील म्हंटलं जातं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. प्रेयसी परीक्षेत नापास या रागातून संतापलेल्या प्रियकराने अख्खी शाळाच पेटवली असल्याची ताजी घटना आता समोर आली आहे. या घटनेने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी घटनेची सत्यता पडताळून आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
त्याचं झालं असं, या प्रियकराची प्रेयसी त्याच शाळेत शिकत होती. मात्र नुकत्याच झालेल्या परीक्षेत त्याची प्रेयसी नापास झाली. विशेष बाब म्हणजे, दोघांचाही साखरपुडा झाला होता. मात्र होणारी पत्नी शाळेतील परीक्षेत नापास झाल्यानं लग्न पुढे ढकललं जाईल.
याचबरोबर तिला पुन्हा वर्षभर अभ्यास करावा लागेल, या विचारातून तरुणानं प्रेयसीची शाळाच पेटवून दिली. धक्कादायक बाब म्हणजे, आगीमध्ये शाळेतील कंट्रोल रुम जळून खाक झाली. या भीषण आगीत शाळेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून गेली. या घटणेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बकरा कापत असल्याचं स्वप्न पाहता पाहता शेतकऱ्याने स्वताचं गुप्तांग कापलं, वाचून हादराल
मविआ अजूनही भक्कम! विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी ‘असा’ आखला मास्टरप्लॅन