Share

‘अशी’ बिअर पिल्याने तरुणाचा झाला मृत्यू; सविस्तर वाचून हादरल

drink

सोशल मिडियावर मिनिटा-मिनिटाला लाखो नवीन व्हिडिओ समोर येत असतात. अनेक व्हिडिओ हे सकारात्मक असतात तर त्यातील काही नकारात्मक. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही गंभीर. अलीकडे तरुणांमध्ये नशेच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळत आहे.

असच एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलं आहे. मित्रांनी दिलेल्या चॅलेंजच्या नादात तरुणाने दारुची अख्खी बाटली खाली केली. अन् त्या तरुणाला मृत्युने गाठलं. या घटनेने सध्या सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे तरुणांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

दारु शरीरासाठी हानिकारक असतेच पण, दारुमुळे अनेक संसारही उद्ध्वस्त झाले आहेत. दारुच्या व्यसनापायी अनेक जण नको ते कृत्य करतात आणि याचा परिणाम दारु पिणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या परिवारालाही भोगावा लागतो. मात्र असं असलं तरी देखील नशा केलीच जाते, अन् त्यातून अनेक धक्कादायक घटना देखील घडतात.

वाचा नेमकं घडलं काय..?
ही घटना दक्षिण आफ्रिकेतील असल्याच सांगितलं जातं आहे. मृत तरुण  25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण ‘ब्लू कॉर्नर कार वॉश अँड लिकर रेस्टॉरंट’मध्ये मद्यपान करत होता. मद्यपान करत असताना त्याचे दुर्दैवी निधन झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जो दारूची बाटली लवकर संपवेल, त्याला 1 हजार रुपये बक्षीस मिळेल, असं चॅलेंज देण्यात आलं होतं. या तरुणानं ते चॅलेंज स्वीकारलं. आणि जिंकण्याच्या नादात त्याने 2 मिनिटांत दारुची बाटली संपवली.

अन् एका मिनिटात होत्याच नव्हतं झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाटलीमध्ये 35 टक्के अलकोहोल होतं. या तरुणाने ते 1 मिनिटात प्यायल्यामुळे थेट त्याच्या हृदयावर परिणाम झाला. त्याला चक्कर आली, त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बॅग्राउंडला म्यूजीक वाजत आहे. त्याचवेळी आजूबाजूला उपस्थित असलेले लोक या व्यक्तीला दारू पिण्यास चिअर देखील करत आहेत. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
केसरकर म्हणाले, मी पवारांबद्दल कधीही अपशब्द काढला नाही, आव्हाडांनी ‘तो’ किस्सा सांगत केली पोलखोल
जोपर्यंत हे किंग, बादशाह, सुलतान आहेत तोपर्यंत सिनेमा बुडतच राहणार, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा टोला
सलमानचा भाव वाढला, बिग बॉससाठी वाढवली फी, आता घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी
तिच्या डोळ्यात रोज पाणी असतं, तुम्ही तुमच्याच लोकांवर.., सायना नेहवालचा नवरा भडकला

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now