सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही समाज प्रबोधन करणारे असतात मात्र काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे.
हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. अलीकडे माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं, अशा घटनांचं प्रमाण वाढू लागलं आहे. अशातच एक व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. आपल्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापानं १० किलोमीटरची पायपीट केली आहे.
हे प्रकार आता समोर आल असून त्यावरून सरकारी यंत्रणांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.. ? ही घटना छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. ईश्वर दास हे येथील अमदला गावचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीची प्रकृती बिघडली होती. तिचा तापही उतरत नव्हता. शुक्रवारी कुटुंबीयांनी मुलीला घेऊन सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लखनपूर आरोग्य केंद्र गाठलं. धक्कादायक बाब म्हणजे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांनी रुग्णवाहिकेसाठी विनवणी केली, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णवाहिका न मिळाल्याने वडिलांनी आपल्या 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर ठेवला आणि १० किमी चालत आपल्या घरी पोहोचले. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
तर दुसरीकडे, यासंदर्भात थेट छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘मी तो व्हिडीओ पाहिला. तो व्हिडीओ सुन्न करणारा आहे. मी यासंदर्भात वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत”, असं देव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1507551826626822146?s=20&t=lqaGffi1JCuJsQksoVCblw
तसेच माध्यमांनी ईश्वर दास यांना या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी संपूर्ण परिस्थिती सविस्तर सांगितली. चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, मृत मुलीच्या वडिलांनी रुग्णालयातील नर्सवर केला आहे. तर दुसरीकडे कुटुंबीयांनी न ऐकल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही; अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
पुण्यात घर घ्यायचे स्वप्न साकार होणार! बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात मिळणार घरे
“पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”
“माझी सैराटसाठी निवड झाली नाही, पण अचानक…”, ‘झुंड’मधील ‘भावना भाभी’ने सांगितला भन्नाट किस्सा