या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हा प्रकार पाहून चक्क पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील फतेहपूरमधील परिसरातील ही विचित्र चोरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ असं या चोरट्याचं नाव आहे.
या चोरट्याने 3 दुकान फोडून फक्त 20 रुपये चोरले आहे. वाचून तुम्हाला देखील धक्का बसला ना मात्र ही घटना खरी आहे. अवघ्या 20 रुपायांसाठी या तरुणाने दुकान फोडली. पोलिसांनी या प्रकरणी त्याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक कारण दिले आहे.
चला तर मग जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? ही घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील फतेहपूरमधील परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. आसिफ या चोरट्याने एकाच रात्री तीन वेगवेगळ्या दुकानाची टाळं फोडली. त्याने फक्त 20 रुपये चोरले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्यांनी पाहिलं तर त्यांना चोरी झालेलं पाहून जबर धक्का बसला. व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ते चोरापर्यंत पोहोचले.
पोलिसांनी काही तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्यांना सुद्धा जबर धक्का बसला. त्या चोरट्याने चोरीचे कारण सांगितले आणि पोलिसांनी डोक्याला हात लावला. त्याला कुरकुरे खायचे होते, म्हणून त्याने चोरी केली असल्याचे तपासादरम्यान उघड झाले.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही व्यक्ती मानसिक परिस्थिती ठिक नसल्याचं सांगितलं जातं आहे. त्याला उपचाराची गरज आहे. आता त्याच्या घरातल्यांना बोलवून त्याच्यावर उपचार केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. तसेच पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.