man arrested when he look girl 14 second | काही पुरुष हे असे असतात, जे मुलींकडे महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहत असतात. त्यांचे एकटक बघणे मुलींना अस्वस्थ करुन टाकते. कारण त्यांची मुलींकडे बघण्याच्या नजरेमागे त्यांची घाणेरडी मानसिकता लगेच दिसून येते. पण आता असे करणे पुरुषांना चांगलेच महागात पडू शकते.
कोणत्याही मुलीकडे १४ सेकंदापेक्षा जास्त वेळ एकटक बघणे हा गुन्हा असणार आहे. त्यामुळे असे करणाऱ्याला तुरुंगातही जावे लागणार आहे. जाणूनबुजून किंवा थट्टामस्करतही मुलींना १४ सेकंद बघणे महागात पडू शकते. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि कलम ५०९ अंतर्गत पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मुलींकडे १४ सेकंद बघणे हे प्रकरण सुद्धा छेडछाडच्या अंतर्गत येते. त्यामुळे पुरुषांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी मुली असताना पुरुष त्यांच्याकडे एकटक बघण्यच्या अनेक घटना समोर येत असतात. या गोष्टीवर २०१६ मध्ये केरळमध्ये अंमलबजवणी करण्यात आली होती.
केरळमधील न्यायालयाच्या तरतुदीनूसार कोणत्याही मुलीकडे १४ सेकंदापेक्षा जास्त बघणे हा गुन्हा आहे. त्यानुसार मुलीने तक्रार केल्यास मुलाला शिक्षा होऊ शकते. कलम २९४ (अ) आणि (ब) यांचा आधार पीडित महिला घेतात. यानुसार अश्लील हावभाव, महिलांसाठी गाणी गाणे अशा गोष्टींमुळे गुन्हेगाराला तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते.
तसेच भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत महिला किंवा तरुणीविरुद्ध अश्लील कृत्ये करणे, हातभाव करणे, अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांना एक वर्षांपर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे वकील दीपक भारद्वाज यांनी म्हटले होते.
या निर्णयानंतर देशात वेगवेगळ्या स्तरातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. महिला आयोगाच्या माजी सदस्या शताब्दी पांडे म्हणाल्या की, मुलींसाठी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणे सोपे नाही. त्यामुळेच महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे येणाऱ्या तक्रारींवर त्वरित कारवाई केली जाते. पण बहुतांश मुलींना हे कार्यालयच माहिती नाही.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बहुतांश मुली लेखी तक्रार करायला घाबरतात. त्यांनी छोटा अर्ज लिहून तक्रार केली तरी त्यावर लवकरात लवकर कार्यवाही केली जाते. आयोगाच्या मदतीने आपण केवळ आपल्या हक्कांसाठी लढू शकत नाही, तर कायद्यात बदल करण्याची किंवा महिलांच्या गरजेनुसार नवीन कायदे करण्याची मागणीही करू शकतो, हे आपण समजून घेतले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
sasun : “मी जगलो काय अन् मेलो काय फरक पडत नाही, डॉक्टरसाहेब माझी किडनी घ्या अन् मला दीड लाख द्या”
नुसती ताडतोड! ‘या’ फलंदाजाने फक्त 33 चेंडूत हादरवली दुबई, गोलंदाजांची कत्तल; पहा व्हिडीओ..
तिकडे वडील टिळा लावत होते; इकडे मुलगी लग्नमंडपातूनच प्रियकरासोबत झाली फरार